Join us

निवेदिता जोशी यांचे आई-वडील, बहीण सगळ्यांचा आहे अभिनयक्षेत्राशी संबंध, केले आहे चित्रपटात काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2021 7:37 PM

निवेदिता सराफ यांचे आई वडील दोघेही कलाकार असून त्यांची बहीण देखील एक अभिनेत्री आहे.

ठळक मुद्देनिवेदिता जोशी यांच्या बहिणीने डॉक्टरेट केली असली तरी त्यांनी अभिनयाचा छंद देखील जोपासला आहे.

निवेदिता जोशी सराफ यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. त्यांना प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्यांच्या सगळ्याच भूमिका त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडल्या आहेत. सध्या त्या अग्गंबाई सूनबाई या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. 

निवेदिता जोशी सराफ या अशोक सराफ यांच्या पत्नी असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, निवेदिता सराफ यांचे आई वडील दोघेही कलाकार असून त्यांची बहीण देखील एक अभिनेत्री आहे. त्यांचे वडील गजन जोशी यांनी ७० च्या दशकातील दैवाचा खेळ, आधार, सौभाग्य कांक्षीनी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते तर त्यांची आई विमल जोशी यांनी बलराज सहानी, संजीव कुमार अशा अनेक कलाकारांसोबत हिंदी नाटकांत काम केले होते. 

निवेदिता जोशी यांच्या बहिणीने डॉक्टरेट केली असली तरी त्यांनी अभिनयाचा छंद देखील जोपासला आहे. डॉ मीनल परांजपे असे त्यांच्या बहिणीचे नाव असून अरण्यक या नाटकात त्यांनी कुंतीची भूमिका साकारली होती. तसेच ध्यासपर्व या चित्रपटात देखील त्या एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. 

टॅग्स :निवेदिता सराफअशोक सराफ