अशोक सराफ (Ashok Saraf) आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. ही जोडी नेहमीच चर्चेत असते. या जोडीला ऑनस्क्रीनसह ऑफस्क्रीनवरही प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. या दोघांची लव्हस्टोरी आणि लग्नाचा किस्सा त्याकाळात खूप गाजला होता. निवेदिता सराफ यांनी नुकतेच अशोक सराफ यांच्याबद्दल सांगितले.
निवेदिता सराफ यांनी नुकतेच रेडिओ सिटीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना त्यांच्या आवडी-निवडीबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी मनमोकळेपणाने उत्तर दिली. यावेळी निवेदिता यांना 'तुम्हाला काय खायला आवडतं?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी चिकन कबाब आणि सूप हे मला कधीही आवडते, असे उत्तर दिले. त्यानंतर निवेदिता सराफ यांना अशोक मामा काय चांगलं बनवतात? असं विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी तुमचे अशोक मामा मला बनवतात, असे मिश्किल उत्तर दिले. त्यांचे हे उत्तर ऐकून सर्वजण हसू लागले.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या वयामध्ये तब्बल १८ वर्षांचे अंतर आहे. अशोक सराफ आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली होती. निवेदिता जोशी आणि अशोक सराफ यांची मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांचे प्रेम जुळले. अशोक सराफ यांना त्यांनी प्रपोज देखील केले. त्यानंतर त्या दोघांनी मंगेशी मंदिरात जाऊन लग्न केले.