Join us

निपुण धर्माधिकारीचा हा सिनेमा रसिकांना देणार खास सरप्राईज!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2017 6:34 AM

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम,आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, ...

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम,आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाईम प्लीज, मुंबई-पुणे-मुंबई २ यांसारखे मराठी सिनेमांनी रसिकांचे भरघोस मनोरंजन केल्यानंतर ‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’ची  आणखी एक खास सिनेमा रसिकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज आहेत.‘एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंट’बॅनरअंतर्गत निपुण धर्माधिकारी रसिकांसाठी 'बापजन्म' नावाचा सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन येत आहे.‘बापजन्म’ १५ सप्टेंबर रसिकांच्या भेटीला येणार असूनआधीच्या सिनेमांप्रमाणेच हा सिनेमाही रसिक डोक्यावर घेतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. सिनेमाच्या टायटलवरून बाप लेकाचे नाते सिनेमातून उलगडले जाणार अशा आशयाची कथा असल्याचे बोलले जात आहे.‘मराठी कास्टिंग काऊच’ या नेबसिरीजच्या माध्यमातून निपुण धर्माधिकारी नावरूपाला आला. अगदी अल्पावधीतच आपल्या नाविन्यपूर्ण आणि वेगळ्या संकल्पनेच्या माध्यमातून  युवकांमध्ये आज निपून लोकप्रिय आहे. मोठ्या प्रमाणावर निपूणचा मोठा चाहता वर्ग आहे. निपूणने २००९ मध्ये ‘नाटक कंपनी’ या संस्थेची स्थापना केली आणि त्या माध्यमातून शतकांपूर्वी रंगभूमीवर आलेल्या संगीत नाटकांचे पुनर्रुजीवन केले. त्या माध्यमातून शेक्सपियरच्या परंपरेलाही उजाळा दिला गेला. या नाटकांची मराठी रंगभूमीवर तर वाहवा झालीच पण त्याचबरोबर अमेरिकेतील आणि अगदी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारत रंगमहोत्सवातही निपूणला मानाचे स्थान मिळाले.भविष्याचा वेध घेणारा दिग्दर्शक म्हणून निपुणची नवी ओळख निर्मात होत आहेच. पण त्याचबरोबर निपुणने अनेक मराठी चित्रपटांमध्ये कलाकार आणि लेखक म्हणूनही आपला ठसा उमटवला आहे. त्यांत ‘नौटंकी साला’  आणि ‘हरीश्चंद्राची फॅक्टरी’यांचा  उल्लेख करावाच लागेल.‘बापजन्म’ हा शब्द मराठी जनमानसात लोकप्रिय आहे. निपुण यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘बापजन्म’ या आगामी चित्रपटाने रसिकांची उत्कंठा वाढत असून हा सिनेमा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरेल  असा विश्वास निपूणने व्यक्त केला आहे.