Join us

OMG! लग्नाआधी नेहा पेंडसे होती या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 07:00 IST

नेहा पेंडसे लग्नाच्या आधी या व्यक्तीसोबत होती लिव्ह इनमध्ये, खुद्द तिनेच केला खुलासा

बिग बॉस 12 फेम व मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने बिझनेसमन शार्दुल बयाससोबत लग्न केल्यानंतर जास्त ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. शार्दुलचं याआधीही दोन लग्न झाले असून त्याला मुलं असल्याचे समजल्यावर नेटकऱ्यांनी नेहावर खूप टीका केली होती. मात्र यावर ट्रोलर्सनाही नेहाने चांगलेच खडेबोल सुनावले होते. ती म्हणाली होती की, माझ्या नवऱ्याचे दोनदा घटस्फोट झालं तर त्यात काय झालं. मीसुद्धा व्हर्जिन नाही. लग्नानंतर नेहा शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे हनीमूनला सुद्धा गेले नव्हते. नुकतेच आता नेहाने ई टाईम्स टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत लग्नानंतरच्या तिच्या जबाबदारी व ट्रोलर्सकडे कसे पाहते, याबद्दल चर्चा केली.

यावेळी मुलाखतीत नेहा म्हणाली की, लग्नानंतर मला खूप वाईटरित्या ट्रोल करण्यात आले. लोकांनी मला डाव्या, उजव्या आणि समोरून ट्रोल केले. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की सत्य व परिस्थिती माहित नसतानाही लोक टीका व कमेंट करत होती. त्यांना आमच्या लाइफबद्दल माहित नसतानाही ट्रोल करत होते. त्यावेळी मला असेही वाटले की, जे ट्रोल करत आहेत त्यांच्या आयुष्यात काहीही उरलेले नाही. त्यांना एखाद्या व्यक्तीला अपमानित करण्यात आनंद मिळतो. यापूर्वी कधीच मी इतकी ट्रोल झाली नव्हती. 

नेहा पुढे म्हणाली की, बिग बॉससारख्या रिएलिटी शोमधूनदेखील मी क्लीन चीट बाहेर पडले होते. पण, लग्नानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण या गोष्टीकडे जास्त गांभीर्यानं पाहिले नाही.

नेहाने या मुलाखतीत सांगितले की, फार कमी लोकांना माहित होते की मी लग्नाच्या आधी शार्दुल बयाससोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहात होते. लिव्ह इनमध्ये रहाण्याचा उद्देश हाच होता की आम्ही एकमेकांना आतून व बाहेरून ओळखावे आणि सोबत पॉझिटिव्ह व निगेटिव्ह गोष्टी. त्यामुळे आम्हाला एकमेकांच्या सवयी माहित होत्या. त्याचा आमच्यावर काहीच फरक पडला नाही.

लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्याचे नेहा सांगते. आता मला माझे घर आहे. पण नवऱ्यासोबत माझे घर ही गोष्ट खूप वेगळी आहे. नवऱ्यासोबत असता तेव्हा तुम्ही जबाबदार बनता आणि मी जबाबदार झाले आहे.

टॅग्स :नेहा पेंडसेबिग बॉस 12