Join us

'भररस्त्यात त्याने माझ्या ब्रेस्टला..'; प्रिया बापटसोबत घडला धक्कादायक प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 09:38 IST

Priya bapat: 2010 मध्ये प्रियासोबत एका व्यक्तीने गैरवर्तन केलं होतं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (priya bapat). उत्तम अभिनयकौशल्याच्या जोरावर प्रियाने इंडस्ट्रीत तिचं हाक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मराठीसह हिंदी वेबविश्वातही प्रियाने तिच्या अभिनयाची छाप उमटवली आहे. त्यामुळे नाटक, सिनेमा, मालिका आणि वेब सीरिज अशा प्रत्येक क्षेत्रात तिचा दांडगा वावर असल्याचं पाहायला मिळतो. विविध माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रियाने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिला आलेला एक वाईट अनुभव शेअर केला.

शूटिंग संपवून घरी जात असताना प्रियासोबत दादरमध्ये वाईट घटना घडली. एका पुरुषाने भर बाजारात तिच्यासोबत गैरवर्तन केलं. अलिकडेच प्रियाने ‘हॉटरफ्लाय’ ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने धक्कादायक प्रसंग सांगितला.

प्रियाने दिलेल्या मुलाखतीमध्ये २०१० मध्ये घडलेला एक थक्क करणारा प्रसंग सांगितला. हा प्रसंग तिच्या घरासमोरच्या गल्लीमध्येच घडला होता. एका अज्ञात व्यक्तीने तिच्या ब्रेस्टला हात लावला आणि तिथून त्याने पळ काढला होता.

नेमकं काय घडलं प्रियासोबत?

"मी शूट संपवून घरी जात होते. त्यावेळी माझ्या हातात सामानाच्या पिशव्या होत्या आणि दुसरीकडे मी फोनवर बोलत होते. याच वेळी अचानक एक माणूस माझ्यासमोर आला आणि त्याने माझ्या ब्रेस्टला हात लावला. आणि, क्षणात तो तिथून पसार झाला. मुळात नेमकं काय घडलं हे समजायलाच मला तीन सेकंद लागले. मी तिथे स्तब्ध उभी होते," असं प्रिया म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मी मागे वळून पाहिलं तर तो माणूस तिथे नव्हता. तो पळून गेला होता. मी घरी आले पण माझी आई नेमकी घरी नव्हती. बाबा होते. त्यांना काय घडलंय हे कसं सांगावं हेच मला कळत नव्हतं. मी खूप रडत होते. माझ्या बाबांनी विचारलं की काय झालंय? मग मी घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. जे काही घडलं त्याचं त्यांना वाईट वाटत होतं, ते त्याक्षणी असहाय्य सुद्धा झाले होते. काय करावं हे त्यांनाही कळत नव्हतं. पण ‘अशा गोष्टी होत असतात,’ 'हे तुझ्याबरोबर घडायला नको होतं, मी त्याला मारेन' असं काहीच ते बोलले नाहीत. कारण, मारणार तरी कसे?” 

दरम्यान, या प्रसंगानंतर प्रिया प्रचंड सावध झाल्याचं तिने सांगितलं. प्रियाने पहिल्यांदाच हा घडलेला प्रसंग शेअर केला आहे. या मुलाखतीमध्ये प्रियाने पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफमधील अनेक किस्से, अनुभवदेखील यावेळी सांगितले आहेत.

टॅग्स :प्रिया बापटसेलिब्रिटीसिनेमावेबसीरिज