मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक काळ गाजवलेल्या अभिनेत्री आज वृद्धापकाळामुळे अभिनय क्षेत्रापासून दूर आहेत. यात सुलोचना लाटकर, चित्रा नवाथे, रेखा कामत, संध्या शांताराम, वत्सला देशमुख, दया डोंगरे या ज्येष्ठ अभिनेत्रींचा समावेश आहे. या अभिनेत्री भलेही अभिनय करताना दिसत नसल्या तरी आजही त्यांचे प्रेक्षकांच्या मनातील स्थान कायम आहे.
सुलोचना लाटकर-
चित्रपटसृष्टीचा दीर्घकाळ अनुभवलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून सुलोचना लाटकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते. हिंदी चित्रपटसृष्टीतील निरागस आई म्हणून त्या प्रचलित आहेत. नुकतेच ३० जुलै रोजी त्यांनी आपल्या वयाच्या ९४ व्या वर्षात पदार्पण केले होते. हिंदी मराठी अशा जवळपास ३०० चित्रपटात त्यांनी काम केले आहे. त्यामुळे अनेक नामवंत कलाकारांना त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. सासू वरचढ जावई, अंदर बाहर, मोलकरीण, मजबूर, कहाणी किस्मत की, साधी माणसं, सांगते ऐका, दिलं देके देखो , सासुरवास, वहिनीच्या बांगड्या अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटात नायिकेच्या, सहाय्यक आणि आईच्या भूमिका साकारल्या. आज सिनेइंडस्ट्रीपासून त्या दूर असल्या तरी अनेक कलाकार त्यांच्या घरी त्यांना भेटायला जातात.
दया डोंगरे-
दया डोंगरे मराठी तसेच हिंदी सिनेइंडस्ट्रीतील एक लोकप्रिय नाव आहे. खाष्ट आणि कजाग सासूच्या भूमिका त्यांनी अनेक मराठी चित्रपटात साकारल्या आहेत. त्यांच्या आई यामुताई मोडक या हौशी नाट्य अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. खट्याळ सासू नाठाळ सून, तुझी माझी जोडी जमली रे, लेकुरे उदंड झाली, उंबरठा, दौलत की जंग, नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटात त्या पहायला मिळाल्या आहेत. दया डोंगरे यांनी काही वर्षांपासून प्रकृती ठीक नसल्यामुळे अभिनयातून निवृत्ती घेतली आहे. त्यांना दोन विवाहित कन्या असून मोठी मुलगी संगीता ही मुंबईत त्यांच्या घराजवळ राहते तर धाकटी अमृता बंगळुरूत राहते. त्यांचे पती शरद डोंगरे यांचे २०१४ मध्ये आकस्मिक निधन झाले.
वत्सला देशमुख-
संध्या शांताराम-
चित्रा नवाथे –
रेखा कामत-
रेखा कामत आणि चित्रा नवाथे या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. या दोघींनी लाखाची गोष्ट या चित्रपटात एकत्रित काम केले होते. रेखा कामत या पूर्वाश्रमीच्या कुमुद सुखटणकर होय. चित्रपट लेखक ग रा कामत यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या. एका लग्नाची दुसरी गोष्ट, प्रपंच, माणूस, तरुण तुर्क म्हातारे अर्क, प्रेमाच्या गावा जावे, लग्नाची बेडी, ऋणानुबंध, अग्गबाई अरेच्चा! या चित्रपट, नाटक आणि मालिकेतून त्यांनी अभिनय साकारला होता. खूप वर्षांपूर्वी त्यानी प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनयातून निवृत्ती स्वीकारली होती.