‘पछाडलेला’ (Pachadlela) या चित्रपटातील दुर्गा मावशीची लेक म्हणजेच मनिषा तुम्हाला आठवत असेलच. ही भूमिका अभिनेत्री अश्विनी कुलकर्णीने ( Ashwini Kulkarni) साकारली होती. सध्या अश्विनी चित्रपटसृष्टीत फारशी अॅक्टिव्ह दिसत नसली तरी सोशल मीडियावर मात्र ती बरीच अॅक्टीव्ह आहे. सध्या तिची एक पोस्ट तुफान व्हायरल होतेय.अश्विनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने वेस्टर्न कपड्यावर काचेच्या बांगड्या घालण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिलं आहे. साधारण 2758 बायकांनी मला माझ्या डेनिम आणि बांगड्यांबद्दल विचारलं, त्या सर्वांसाठी हे सोशल मीडियावर स्पष्टीकरण, असं तिने म्हटलं आहे. शिवाय बांगड्या, पैंजण, टिकली, गजरा कधीही कुठेही कशावरही परिधान करणे माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो बजावणारच, असंही तिने म्हटलं आहे.
वाचा, अश्विनीची पोस्ट तिच्याच शब्दांत...
"तू डेनिम वर बांगड्या काय घातल्या आहेत??"असा प्रश्न मला नवरात्री च्या 9 दिवसात सतत विचारला जातो!!का??डेनिम मला सुटसुटीत वाटते, दिवस भर काम करताना , गाडी चालवताना etc बरी पडते..बांगड्या मला आवडतात! सणवार, कार्य असताना आवर्जून घातल्या जातात..पण नवरात्री च्या निमित्ताने सलग 9 दिवस त्या हातात ठेवाव्या असा प्रयत्न मी करते आणि माझी डेनिम किंवा माझ्या बंगड्या एक मेकिंवर objection पण घेत नाहीत फार वर्षांपूर्वी मी हैदराबाद मध्ये एका फिल्मी पार्टी ला गेले असताना "एकाने" कौतुकाने आणि आठवणीने माझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणला..(हैदराबदमधील गजरे आणि बांगड्या हा एक स्वतंत्र विषय आहे )मी mini skirt मध्ये होते..पण देणाऱ्या च्या भावना, आणि मोगऱ्याच्या सौंदर्याचा मान ठेऊन मी लगेचच तो केसांत माळला..आणि खरं सांगते तिथे अनेक नजरा माझ्याकडे कौतुकाने बघू लागल्या..दक्षिण भारतात Western outfits वर टिकली, पैंजण, बांगड्या, गजरे सर्रास वापरल्या जातात..North मध्ये पण मोठे लाल चुडे , बोटभर जाडीच सिन्दुर, आणि डेनिम अशी सरमिसळ खूप बघायला मिळते.आपण मात्र डेनिम वर पैंजण घातलं, म्हणजे "गावंढळ"बांगड्या घातल्या म्हणजे काकू बाई..अशी समजूत करून घेतली आहे..वावरायला सोपे कपडे परिधान नक्कीच करावेत..पण त्या बरोबर आपल्या संस्कृती प्रमाणे बांगड्या घातल्या तर बिघडलं कुठे??आणि ज्यांना नाही आवडत त्यांनी नका घालू..पण ज्यांना आवडतं त्यांनी कोणाचीही पर्वा न करता खुशाल घाला...(हवं ते घालणाऱ्या उर्फी जावेद आणि तत्सम influencers , पेक्षा हे indo western combination फारच सुसह्य आहे नाही का )साधारण 2758 बायकांनी मला माझ्या denim आणि बांगड्या बद्दल विचारलं त्या सर्वांसाठी हे social media वरून "स्पष्टीकरण"!!बांगड्या, पैंजण, टिकली, गजरा कधीही कुठेही कशावरही परिधान करणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे..आणि तो मी बजावणार च वि. सु.वरील प्रकट केलेलं मत हे माझं वैयक्तिक आहे त्या मागे कोणताही #बांगड्या किंवा #गजरा अशा चळवळी सुरू करण्याचा उद्देश अजीबात च नाही