Join us

Padman Challenge:मराठी कलाकारांनीही हातात सॅनिटरी नॅपकिन घेऊन शेअर केले फोटो,आणि सांगितले असे काही अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2018 8:53 AM

मासिक पाळी आणि स्वच्छतेबाबत ब-याच महिलांना आजही अनेक गोष्टी माहित नाहीत.कारण त्याचं महत्त्व काय याबाबत तेवढी जागरुकता पसरवण्यात आलेली ...

मासिक पाळी आणि स्वच्छतेबाबत ब-याच महिलांना आजही अनेक गोष्टी माहित नाहीत.कारण त्याचं महत्त्व काय याबाबत तेवढी जागरुकता पसरवण्यात आलेली नाही.उलट याबाबत अनेक गैरसमज समाजात असून त्याबद्दल कुणालाही बोलायचं नसतं.अनेक भागात सॅनिटरी पॅड्स महाग असल्याने त्या खरेदी करण्यात त्यांना विशेष रस नसतो. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला पॅडमॅन सिनेमा प्रदर्शित झाला असून मासिक पाळी आणि या काळात वापरण्यात येत असलेल्या सॅनिटरी नॅपकिन अनेक गोष्टींवर सिनेमातून भाष्य करण्यात आलेले आहे.सध्या सोशल मीडियावर हॅशटॅग पॅडमॅन खूप ट्रेंड होत आहे.ट्विंकलने नुकतेच 'पॅडमॅन चॅलेंज'ची सुरुवात केली आहे.या चॅलेंजसाठी एका सेलिब्रेटीने दुस-या सेलिब्रेटीचे नाव नॉमिने करत  आपल्या हातात सॅनिटरी नॅपकिन घेऊन एक फोटो सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करायचा आहे.बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींना पॅडमॅन चॅलेंज स्विकारत आपले फोटो शेअर केले होते. आता बॉलिवूड पाठोपाठ मराठी कलाकार मंडळींनीही पॅडमॅन चॅलेंज स्विकारत हातात सॅनिटरी नॅपकिन घेऊन फोटो शेअर केले आहेत.सई ताम्हणकरनेही आपला फोटो शेअर करत म्हणाली,''मासिक पाळी येणे हे नैसर्गिक आहे आणि त्यामुळेच स्त्रीला मातृत्व प्राप्त होते.महिला असण्याचा  मला अभिमान आहे''.तर 'लागिरं झालं जी' फेम 'फौजी' नितीश चव्हाणनेही सॅनिटरी नॅपकिनसह फोटो शेअर करत ''लाज बाळगण्यासारखे काही नाही आणि आज ग्रामीण भागात या गोष्टींचा प्रसार होणे फार गरजेचे'' असल्याचे त्याने म्हटले आहे.सामाजिक संदेश देणारा पॅडमॅन सिनेमा असल्यामुळे बॉलिवूड कलाकाराप्रमाणेच मराठी कलाकारही प्रमोशन करताना दिसत आहेत.Also Read:वर्ल्ड टूरवर असलेल्या मानुषी शिल्लरने मासिक पाळीबद्दल केले मोठे वक्तव्य,वाचा सविस्तर!मानुषी छिल्लरने मासिक पाळीबद्दल एक मोठे विधान केले आहे.मानुषीच्या मते, समाजात बदल घडवून आणण्यासाठी महिलांच्या या समस्येबद्दल चुकीचा विचार करणे सोडावे. सध्या मानुषी वर्ल्ड टूरवर असून, महिलांनी या दरम्यान स्वच्छतेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे, याबाबतची जनजागृती करताना दिसत आहे. मानुषीने माध्यमांशी बोलताना म्हटले की, राजकीय पक्षांनीदेखील त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये याबाबतचा उल्लेख करणे गरजेचे आहे.मानुषीने म्हटले की, विश्वसुंदरीचा किताब जिंकल्यानंतर जेव्हा मी हरियाणाला गेली होती, तेव्हा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी तरुणींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले होते. मात्र माझ्या मते ही प्रक्रिया तात्पुरती आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांनी स्वच्छतेबद्दल विशेष लक्ष द्यावे, या मुद्द्याचा मानुषीच्या सामाजिक कामात समावेश आहे. जेव्हा मानुषीने या स्पर्धेत सहभाग घेतला होता, तेव्हादेखील तिने याबाबतचा उल्लेख केला. आता ती या मुद्द्यावर आणखी प्रभावीपणे काम करताना दिसत आहे.