‘बापजन्म’ आता परदेशात सुद्धा होणार प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 9:55 AM
प्रख्यात रंगभूमी कलाकार निपुण धर्माधिकारी यांचे दिग्दर्शन असलेला आणि सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन यांच्या प्रमुख ...
प्रख्यात रंगभूमी कलाकार निपुण धर्माधिकारी यांचे दिग्दर्शन असलेला आणि सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित 'बापजन्म' हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 'बापजन्म' या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तरआता परदेशात सुद्धा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अमेरिका, युके, स्वीडन, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमध्ये या चित्रपटाचे शो दाखविले जाणार आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सुमतिलाल शाह आणि सिक्स्टीन बाय सिक्स्टी फोर प्रॉडक्शन्सने केली आहे.‘बापजन्म’ची कथा, पटकथा आणि संहिता निपुण धर्माधीकारीनेच लिहीली आहे. तो म्हणतो, कि मला खूप आनंद होत आहे कि ‘बापजन्म’ हा चित्रपट महाराष्ट्रातच नव्हे तर आता अमेरिका, युके, स्वीडन, ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर या देशांमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शित होत आहे. ते पुढे म्हणाले कि “सचिन खेडेकर यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबरोबर दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्याच चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य आणि सन्मान मानतो. त्यांचे केवळ सेटवर असणेही आम्हा सर्वांसाठीच अगदी प्रोत्साहनात्मक असे.” तसेच निपुणने याआधी उमेश कुलकर्णी यांच्या ‘हायवे’ या चित्रपटात काम केले असून तो मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही नाटकांमध्ये दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. ‘भारतीय डिजिटल पार्टी’साठीच्या ‘कास्टिंग काऊच वूईथ अमेय अँड निपुण’ या वेब शोने त्याला घराघरात पोहोचवले. त्याच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखल घेतली गेला असा तो मराठी कलाकार आहे. निपुणचा २०१५मध्ये ‘फोर्ब्स इंडियाज 30 अंडर 30’मधील एक विजेता म्हणून सन्मान झाला. यावेळी बोलताना सचिन खेडेकर म्हणाले, “बापजन्म’ हा शब्द मराठीमध्ये प्रचलित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निपुण करत आहे म्हटल्यावर या चित्रपटाबद्दल साहजिकच उत्सुकता ताणली गेली आहे. या चित्रपटाच्या संहितेबद्दल सर्वोत्तम गोष्ट म्हणजे त्यांत संवेदनशीलता ठासून भरली आहे. मुलगा आणि त्याचे वडील या विषयावर अनेक चित्रपट आत्तापर्यंत आपण पहिले आहेत. पण निपुणने त्याच्या या चित्रपटात हे नाते अगदी वेगळेपणाने साकारले आहे. जो माणूस संवेदनशील नाही त्याच्या संवेदनांबद्दल काही बोलणे हे कठीण काम असते. आम्ही सर्वांनी हे आव्हान पेलण्याचा प्रयत्न केला आहे. निपुण हा आजच्या पिढीचा लेखक आणि दिग्दर्शक आहे. या चित्रपटात त्याने त्याची सर्जनशीलता खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे.”‘बापजन्म’ची कथा, पटकथा आणि संहिता निपुण धर्माधीकारीनेच लिहीली आहे. तो म्हणतो, “सचिन खेडेकर यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाबरोबर दिग्दर्शक म्हणून माझ्या पहिल्याच चित्रपटात काम करण्याची संधी मिळणे हे मी माझे भाग्य आणि सन्मान मानतो. त्यांचे केवळ सेटवर असणेही आम्हा सर्वांसाठीच अगदी प्रोत्साहनात्मक असे.”निपुणने याआधी उमेश कुलकर्णी यांच्या ‘हायवे’ या चित्रपटात काम केले असून तो मराठी रंगभूमीवरील व्यावसायिक आणि प्रायोगिक अशा दोन्ही नाटकांमध्ये दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहे. ‘भारतीय डिजिटल पार्टी’साठीच्या ‘कास्टिंग काऊच वूईथ अमेय अँड निपुण’ या वेब शोने त्याला घराघरात पोहोचवले. त्याच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखल घेतली गेला असा तो मराठी कलाकार आहे. निपुणचा २०१५मध्ये ‘फोर्ब्स इंडियाज 30 अंडर 30’मधील एक विजेता म्हणून सन्मान झाला.सचिन खेडेकर आणि पुष्कराज चिरपूटकर यांच्यासह ‘बापजन्म’ चित्रपटात शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन आणि आकाश खुराणा यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत केयूर गोडसे, नीरज बिनीवाले, अमृत आठवले आणि निपुण धर्माधिकारी. इतर तंत्रज्ञांचा चमू पुढीलप्रमाणे – छायाचित्रण दिग्दर्शक – अभिजित डी आबदे; संकलक – सुचित्रा साठे; संगीत आणि पार्श्वसंगीत – गंधार; गीते – क्षितीज पटवर्धन; ध्वनीरचना – अक्षय वैद्य; निर्मिती रचना – सत्यजित पटवर्धन; वेशभूषा – सायली सोमण; मेक-अप – दिनेश नाईक; विपणन – अमित भानुशाली (52 फ्रायडे सिनेमाज); रंग – कलर-रेडचिलीज डॉट कॉम; व्हिज्युअल प्रमोशन्स – नवप्रभात स्तुडीओ; डिजिटल विपणन – बी बिरबल; प्रसिद्धी मोहीम – सचिन सुरेश गुरव.‘बापजन्म’चे सादरीकरण एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे आहे. या कंपनीने आत्तापर्यंत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय,शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही,टाईम प्लीज, मुंबई-पुणे-मुंबई २’ यांसारखे अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे.ALSO READ : बापजन्म या चित्रपटाच्या टीमने दिली लोकमत ऑफिसला भेट