Join us

पाटील २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात, या कलाकारांच्या असणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 3:52 PM

एका संघर्षमय जिद्दीची कहाणी ‘पाटील’ या आगामी मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि. सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित ‘पाटील’ ध्यास स्वप्नांचा या चित्रपटात शिवाजी पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे.

आयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. काहीजण संघर्षमयी जीवनासमोर हार पत्करतात तर काहीजण याच कष्टप्रद जीवनावर मात करून स्वतःचं जगणं जिद्दीने सकारात्मकरीत्या घडवतात. अशाच एका संघर्षमय जिद्दीची कहाणी ‘पाटील’ या आगामी मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि. सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित ‘पाटील’ ध्यास स्वप्नांचा या चित्रपटात शिवाजी पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास मांडला आहे. येत्या २६ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एका हळव्या प्रेमकथेची किनार दाखवताना शिवाजी पाटील यांचा भुतकाळ, त्यांचा संघर्षाचा काळ, त्यांनी पचवलेले दु:ख व त्यानंतरही उभे राहण्याची जिद्द आपल्यासमोर येणार आहे. अशाच एका कथेचा नायक शिवाजी... कर्तव्य आणि प्रेम यांचा समन्वय साधू पाहतोय. स्वप्न पहायला पैसे लागत नाहीत आणि स्वप्न पूर्ण करायला पण पैसे लागत नाहीत लागते ती फक्त मेहनत आणि जिद्द. शिवाजीने हाती घेतलेलं असाध्य ध्येय पूर्ण होतं का? असंख्य अडचणींवर मात करताना त्याला त्याच्या प्रेमाची समंजस साथ लाभते का? या आणि अशा अनेक उत्कंठावर्धक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी ‘पाटील’ पहायलाच हवा. शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे एस.आर.एम एलियन, यश आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. विशेष भूमिकेत डॉ.जगदीश पाटील (कोकण आयुक्त) तर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत ‘झी नेटवर्क एस्सेलव्हिजन’ चे चेअरमन डॉ. सुभाषचंद्रा दिसणार आहेत.

‘पाटील’ चित्रपटातील प्रेरणादायी कथानकाला योग्य अशा गीत संगीताची जोड देण्यात आली आहे. चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. ‘आनंद शिंदे, आदर्श शिंदे, बिष्णू मोहन, बेला शेंडे, सुखविंदर सिंग व रेहा विवेक, गणपत मिजगर, बाबुल सुप्रियो, श्रेया घोषाल यांनी चित्रपटातील गाणी स्वरबद्ध केली आहेत. चित्रपटाची गीते गुरु ठाकूर, समीर, सुरेश पांडा-जाफर, संजय वारंग, एस.आर.एम यांनी शब्दबद्ध केली असून संगीत आनंद-मिलिंद, सोनाली उदय, प्रभाकर नरवाडे, डी.एच.हारमोनी, एस.आर.एम.एलियन यांनी दिले आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.

या चित्रपटाची कथा,पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे. बॉलीवूड टुरिझम आणि ‘ए व्ही के एंटरटेन्मेंट’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. तेजल शहा, नीता लाड, जय मिजगर, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, मधुकर लोलगे,  रुपेश टाक हे चित्रपटाचे निर्माते असून गणेश बीडकर, रामराव वडकुते, संतुकराव हंबर्डे,  शिवाजी कांबळे, सुधीर पाटील, सौरभ तांडेल,  विजय जैन, जेनील शाह, सोमनाथ दिंगबर, हाजी पटेल, दिपक दलाल सहनिर्माते आहेत. विवेक सिंग कार्यकारी निर्माते आहेत. निलेश गावंड, मनीष शिर्के यांचे संकलन तर छायांकन सुधाकर रेड्डी यकांती, राजा यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. वेशभूषा पृथा मांजरेकर, ज्योती मुलगीर यांनी केली आहे. ध्वनी अनिरुद्ध काळे तर व्ही.एफ एक्सची जबाबदारी प्रशांत मेहता, तर कला दिग्दर्शन सुरेश पिल्ले यांचे आहे. २६ ऑक्टोबर ला ‘पाटील’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.