Join us  

Pavankhind :‘पावनखिंड’मध्ये बाजीप्रभूंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने विशालगडाच्या पायथ्याशी बांधलं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 9:28 AM

Pavankhind: शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्य, धैर्य आणि पराक्रमाचा त्रिवेणी संगम असलेल्या पावनखिंड(Pavankhind) सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं.

शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्य, धैर्य आणि पराक्रमाचा त्रिवेणी संगम असलेल्या पावनखिंड(Pavankhind) सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लची पाटी दिमाखात मिरवलेल्या या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या १९ तारखेला प्रवाह पिक्चर या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या सिनेमात महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडे साकारले आहेत अभिनेता अजय पुरकर यांनी. प्रत्येक कलाकारासाठी एखादी भूमिका म्हणजे परकाया प्रवेश असतो. अजय पुरकर यांनी फक्त बाजीप्रभू साकारले नाहीत तर हा झंझावात ते खऱ्या अर्थाने जगले आहेत. याच प्रेमापोटी अजय पुरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी घर बांधलं आहे. ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्याच भूमीत आपलं घर असावं अशी त्यांची इच्छा होती आणि अखेर ते स्वप्न पूर्ण झालं आहे. 

पावनखिंड सिनेमाने बॉक्स ऑफिसवर विक्रम रचलाच आहे. हेच प्रेम प्रेक्षक प्रवाह पिक्चरवर १९ तारखेला होणाऱ्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरलाही देतील अशी भावना अजय पुरकर यांनी व्यक्त केली. या सिनेमामुळे फक्त मोठ्यांचच नाही तर छोट्या दोस्तांचंही भरभरुन प्रेम मिळालं आहे. हे सगळे छोटे दोस्त मला आवडीने भेटवस्तू घेऊन येतात. एक किस्सा तर एका पालकांनी मला सांगितला तो असा की, त्यांचा मुलगा मध्यरात्री झोपेतून रडत उठला आणि म्हणाला बाजीप्रभू एकटेच उभे राहून लढत आहेत मला तिकडे घेऊन चला. हे निरागस प्रेम पाहून भारावून जायला होतं. या पीढीपर्यंत जेव्हा आपल्या शूरवीरांचं बलिदान पोहोचतं तेव्हा खरं सिनेमा यशस्वी झाला असं ठामपणे म्हणता येईल.

 छोट्या दोस्तांवर शिवसंस्कार रुजवणारा आणि प्रत्येकालाच नवी ऊर्जा देणाऱ्या या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पहायलाच हवा येत्या रविवारी म्हणजेच १९ जूनला दुपारी १ वाजता तुमच्या घरातील टीव्हीच्या पडद्यावर म्हणजेच प्रवाह पिक्चरवर.

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुटुंबाने एकत्र येण्याचे प्रसंग फार कमी वेळा जुळून येतात. सिनेमा हे एक असं जादुई माध्यम आहे जे संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणतं. यानिमित्ताने आठवणींना उजळा मिळतो आणि नकळत चेहऱ्यावर हास्याची आणि समाधानाची लकेर उमटते. संपूर्ण कुटुंबाचा बंध अधिकाधिक घट्ट करण्यासाठी असे क्षण आयुष्यात येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच साध्य करण्यासाठी प्रवाह पिक्चर ही नवी वाहिनी सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दर रविवारी नव्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. पावनखिंड सिनेमापासून या धमादेकार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची सुरुवात होणार आहे.

टॅग्स :अजय पुरकर