अजय पूरकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मालिका व चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारुन अभिनयाची छाप पाडली. २०२२ साली प्रदर्शित झालेल्या 'पावनखिंड' चित्रपटात त्यांनी साकारलेली बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 'पावनखिंड' चित्रपटानंतर विशाळगडाच्या पायथ्याशी त्यांनी घर बांधलं. बाजीप्रभू यांनी आपल्या जीवाची बाजी लावली त्याच मातीत आपलं एखादं घर असावं असं त्यांचं स्वप्न होतं.
अजय पूरकर यांनी नुकतंच एका मुलाखतीत त्यांच्या घराची गोष्ट सांगितली. या मुलाखतीत त्यांना "अशी कोणती गोष्ट आहे, जी तुम्हाला तुमच्या प्रत्येक घरात असावी असं वाटतं," असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो किंवा पुतळा माझ्या प्रत्येक घरात असेल. कारण, त्यांचं अस्तित्व घरात असलंच पाहिजे. शिवराज अष्टकामधील चित्रपट करताना मनात हे रुजलं असेल."
मराठी अभिनेत्याच्या कारमधून महागडी बॅग चोरीला, म्हणाला, "गाडीची काच फोडून..."
"आज आपण महाराष्ट्रात मराठी म्हणून फक्त एकाच माणसामुळे जगतो, हा विश्वास आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व आपल्या घरात असलं पाहिजे. त्यांना आपण पुजलं पाहिजे," असंही पुढे अजय पुरकर यांनी सांगितलं.
"आमच्याकडे मासिक पाळी पाळली जात नाही", हेमांगी कवीचं वक्तव्य, म्हणाली, "माझ्या आजीने..."
अजय पूरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी निसर्गाच्या सानिध्यात बांधलेल्या घराचे काही फोटो व व्हिडिओ शेअर केले होते. 'पावनखिंड' नंतर आता ते 'सुभेदार' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.