Join us

रसिकांच्या लाडक्या लक्ष्याच्या घरातील 'ही' व्यक्तीही आता रुपेरी पडद्यावर,अभिनयनंतर रसिकांचं करणार मनोरंजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 7:14 AM

लक्ष्यानंतर गेल्या वर्षी लक्ष्याचा लेक अभिनय बेर्डे यानेही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.आता लक्ष्याच्या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली आहे.

रसिकांना त्याने खळखळून हसवलं,रसिकांना सारं दुःख विसरायला लावलं आणि मनमुराद मनोरंजन केलं.मराठी असो किंवा हिंदी सिनेमा,त्याच्या कॉमेडीच्या भन्नाट आणि अचूक टायमिंगने रसिकांना अक्षरक्षा वेड लावलं.केवळ कॉमेडीच नाही तर कोणत्याही भूमिकेला जीव ओतून न्याय देणारा अभिनेता म्हणजे सा-यांचा लाडका 'लक्ष्या'.लक्ष्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेने आपल्या अभिनयाने रसिकांना पोट धरुन हसायला लावलं,त्यांचं मनोरंजन केलं.मात्र या जगातून लक्ष्याची अचानक एक्झिट झाली आणि सा-या रसिकांच्या डोळ्यात पाणी आलं.जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत लक्ष्याने रसिकांचं मनोरंजन केलं.लक्ष्यानंतर गेल्या वर्षी लक्ष्याचा लेक अभिनय बेर्डे यानेही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं.आता लक्ष्याच्या कुटुंबातील आणखी एका व्यक्तीने रुपेरी पडद्यावर एंट्री मारली आहे.लक्ष्याच्या अभिनयाचा वारसा अभिनयसह ही व्यक्ती पुढे चालवणार आहे.ही व्यक्ती म्हणजे लक्ष्याची लाडकी लेक स्वानंदी.स्वानंदी बेर्डे ही 'रिस्पेक्ट' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे.किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शिक केला आहे.या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे.या सातपैकी एका स्त्रीची भूमिका स्वानंदी हिने या सिनेमात साकारली आहे.गेल्या वर्षी 'ती सध्या काय करते' या सिनेमातून अभिनय बेर्डे याने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते.या सिनेमातील अभिनयच्या भूमिकेचे आणि त्याच्या अभिनय कौशल्याचे सा-यांकडूनच कौतुक झालं होते.नुकतेच एका पुरस्कार सोहळ्यात 'ती सध्या काय करते' या सिनेमाचे आणि अभिनयचा गौरवही करण्यात आला आहे.आता अभिनयपाठोपाठ त्याची बहिण स्वानंदीसुद्धा रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.आपल्या दोन्ही मुलांच्या चित्रपटसृष्टीतील एंट्रीमुळे त्यांची आई म्हणजेच अभिनेत्री प्रिया बेर्डे यासुद्धा आनंदित आहे.आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून दोन्ही मुलं चित्रपटसृष्टीत येऊन नाव कमावणार असल्याचा अभिमान त्यांच्या चेह-यावर पाहायला मिळतो.स्वानंदीच्या सिनेमात एंट्रीच्या निमित्ताने प्रिया बेर्डे यांनी आपल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.एका मुलाखतीत स्वानंदीच्या वयाची असताना आपणही चित्रपटसृष्टीत आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितलं. (Also Read:आता अभिनय बेर्डे झळकणार 'अशी ही आशिकी' या चित्रपटात)