महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 90.66 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 4.78 टक्क्यांनी वाढला आहे. त्यात मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगीदेखील बारावीत होती आणि तिने ८७% मिळविले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर मुलगी चांगल्या टक्क्यांनी पास झाल्याचा आनंद व्यक्त करत मुलीचे कौतूक केले आहे. शरद पोंक्षे यांनी औषधोपचार व किमो थेरेपी घेऊन त्यांनी कर्करोगावर यशस्वीपणे मात केली आहे.शरद पोंक्षे यांनी सोशल मीडियावर मुलीचा फोटो शेअर करत म्हटलं की, २०१९मध्ये माझे कर्करोगावरील उपचार चालू असताना, हाॅस्पिटलमधे येऊन काॅलेज अभ्यास करून एवढ्या टेंशनमधे असतानाही पिल्लूने ८७%मार्क १२ विज्ञान शाखेत मिळवले. मला अभिमान वाटला. सतत वाईट बातम्या चहूबाजूनी येत असताना एवढी चांगली बातमी सांगायला आनंद होतोय.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे कर्करोगाशी सामना करत होते. औषधोपचार व किमो थेरेपी घेऊन त्यांनी कर्करोगावर यशस्वीपणे मात केली आहे आणि पुन्हा एकदा सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत.