गेला उडत या नाटकाला गुजरातमध्येदेखील पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2016 2:58 PM
सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये मराठी नाटकाची क्रेझ असल्याची पाहायला मिळत आहेत. बरेच प्रेक्षकांचे लाडके कलाकार मालिका, चित्रपट सांभाळून रंगभूमीवर अभिनय ...
सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये मराठी नाटकाची क्रेझ असल्याची पाहायला मिळत आहेत. बरेच प्रेक्षकांचे लाडके कलाकार मालिका, चित्रपट सांभाळून रंगभूमीवर अभिनय करताना दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. एवढेच नाही तर या कलाकारांचे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीसदेखील उतरताना दिसत आहे. आता हेच पाहा ना, प्रेक्षकांचा लाडका कलाकार सिध्दार्थ जाधव याच्या गेला उडत या नाटकाची प्रचंड चर्चा आहे. हे नाटक आता पुणे- मुंबई पुरतेच न राहता या नाटकाचे काही प्रयोग गुजरात राज्यातदेखील झाले आहेत. म्हणतात ना, कलेला भाषेचा अडसर नसतो. नेमकी हेच वाक्य गेला उडत या नाटकाने सिद्ध करून दाखविले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी गेला उडत या नाटकाचे चार प्रयोग गुजरात या राज्यात सादर करण्यात आले होते. या नाटकाला गुजरातमध्येदेखील चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हे नाटक अहमदाबाद आणि बडोदा येथे सादर करण्यात आले होते. तसेच प्रेक्षकांनी भाषा जरी समजली नसली, तरी हे नाटक आम्हाला आवडले असल्याचे म्हटले आहे. खरचं या नाटकाची चर्चा सोशलमीडियावरदेखील बरीच रंगली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर सिध्दार्थदेखील या नाटकाचे प्रमोशन जोरदार करताना सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित हे नाटक आहे. सिध्दार्थने अनेक मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसविले आहे.त्याने जत्रा,टाइम प्लीज. प्रियतमा, खोखो, कुटूंब, क्षणभर विश्रांती, माझा नवरा तुझी बायको त्याने मराठी चित्रपटसृष्ट्रीला दिले आहेत. तसेच तो सध्या नाटकांसहित चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यग्र असल्याचे कळत आहे. .