प्रेक्षकांना नाटकांचं प्लेझंट सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2017 5:24 PM
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत नाटकांची चलती असल्याचे पाहायला मिळत आहेत. रंगभूमीवर एकापाठोपाठ एक नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तसेच कलाकारदेखील ...
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत नाटकांची चलती असल्याचे पाहायला मिळत आहेत. रंगभूमीवर एकापाठोपाठ एक नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. तसेच कलाकारदेखील मोठया प्रमाणावर रंगभूमूकडे पाउले टाकू लागली आहेत. प्रेक्षकांची आणि कलाकारांची ही आवड पाहता प्रेक्षकांसाठी सुयोग या नाटय संस्थेने प्रेक्षकांसाठी नवीन वर्षात खास सरप्राईज आणले आहे. त्याचप्रमाणे १९९५ साली स्थापन झालेल्या सुयोग संस्थेने आजवर मराठी रंगभूमीसाठी अनेक अजरामर नाटकांची निर्मिती केली. आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे अशा प्रसिद्ध लेखकांबरोबर मराठी भाषेत तसेच गुजराती भाषेतही नाटकांची निर्मिती केली. अशा या सुयोग संस्थेला यंदा ३२ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने सुयोगने रसिक प्रेक्षकांसाठी ५ नव्याकोºया नाटकांचे ‘प्लेझंट सरप्राईज’ आणले आहे. यापूर्वी या संस्थेने ‘मोरुची मावशी’ या नाटकाचे पुनरुज्जीवन करून त्याचे २००० प्रयोग केले. २०१० मध्ये ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाची निर्मिती केली. आजवर सुयोग निर्मित सगळ्या नाटकांचे १७ हजारहून अधिक नाट्यप्रयोग झालेले आहेत. यंदाच्या ३२ व्या वर्षी यामध्ये एका नाटकात मकरंद अनासपुरे बºयाच कालावधीनंतर रंगभूमीवरून दिसणार आहे. तर दुसºया नाटकात ‘झी युवा’ या वाहिनीवर गाजत असलेली ‘बन मस्का’ या मालिकेतील शिवानी रांगोळे पहिल्यांदाच व्यावसायिक नाटकातून पदार्पण करणार आहे. सुप्रसिद्ध नेपथ्यकार प्रदीप मुळे हे पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेबरोबर नेपथ्य, प्रकाश, वेशभूषा ही सर्व धुरा सांभाळणार आहेत. एकांकिका स्पर्धातून गाजत असलेल्या २ एकांकिकांचे व्यावसायिक नाटकांत रूपांतर करून तीही प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहेत. त्यामुळे यंदाचे वर्ष रसिक प्रेक्षकांसाठी चांगल्या दर्जेदार नाटकांची मेजवानीच घेऊन येणार आहे.