Join us

महाराष्ट्राची 'कलरफुल' पूजा सावंतचा नवऱ्यासोबत रोमँटिक डान्स! शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 1:55 PM

पुजाने पती सिद्धेशसोबत 'घरत गणपती' चित्रपटातील गाण्यावर रोमँटिक डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे.

महाराष्ट्राची "कलरफुल' पूजा सावंत आज आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.  पूजाने अभिनयाबरोबरचं आपल्या नृत्य कौशल्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.  मराठीसह हिंदीतही तिने अभिनयाच्या जोरावर स्वतःची छाप उमटवली आहे.  आजच्या घडीला तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. पूजाने सिद्धेश चव्हाणबरोबर लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्याच्याबरोबरचे व्हिडीओ पुजा सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिच्या एका व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

पुजाने पती सिद्धेशसोबत 'घरत गणपती' चित्रपटातील गाण्यावर रोमँटिक डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'घरत गणपती' सिनेमातून भुषण प्रधान प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पुजाने तिचा लाडका मित्र भुषण प्रधानला नव्या सिनेमासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. पुजान लिहलं, 'या गाण्यावर माझ्या जवळच्या व्यक्तीसह डान्स करण्यासाठी मी खूप वाट पाहिली. सिद्धेश व माझ्याकडून 'घरत गणपती' चित्रपटाच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा! भूषण तुला या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा कारण, मला माहितीये तू नेहमीच सगळं बेस्ट करतो. २६ जुलैला ‘घरत गणपती’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय तर, नक्की पाहा'.

पुजाच्या या पोस्टवर कमेंट करत भुषणने तिचे आभार मानले. त्यानं लिहलं, 'पुजा आणि सिद्धेश तुम्ही किती गोड आहात !!! खूप खूप धन्यवाद... तुम्हा दोघांना खूप प्रेम'. 'घरत गणपती' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून कोकणातील गणेशोत्सव आणि परंपरा या अत्यंत जवळच्या विषयाला हात घालण्यात आला आहे. गणेशोत्सवातील कोकणातील मज्जा मस्ती आणि परंपरा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. कोकणातील गणेशोत्सवाची झलक आणि त्याचं महत्त्व सांगणारा या आगळ्या वेगळ्या सिनेमाची चाहते वाट पाहत होते. 

टॅग्स :पूजा सावंतभुषण प्रधानसेलिब्रिटीमराठी चित्रपट