Join us

नवऱ्याच्या वाढदिवशी पूजा सावंतची रोमँटिक पोस्ट, सुकन्या मोने कमेंट करत म्हणाल्या, "जावई..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 16:24 IST

लग्नानंतर पूजाच्या नवऱ्याचा पहिलाच वाढदिवस आहे. सिद्धेशच्या वाढदिवासानिमित्त पूजाने खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी कमेंट केली आहे.

उत्कृष्ट अभिनय आणि विविधांगी भूमिका साकारून छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. मराठी सिनेसृष्टीतील या कलरफूल अभिनेत्रीने अगदी कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. काही दिवसांपूर्वीच पूजाने लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत पूजाने सिद्धेश चव्हाणबरोबर सात फेरे घेतले. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

लग्नानंतर पूजाच्या नवऱ्याचा पहिलाच वाढदिवस आहे. सिद्धेशच्या वाढदिवासानिमित्त पूजाने खास पोस्ट शेअर केली आहे. पूजाने सिद्धेशबरोबरच्या काही खास क्षणांच्या फोटोंचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने "माझा दिवस उजळवून टाकणाऱ्या आणि माझं हृदय प्रेमाने भरणाऱ्या या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणखी अशीच खूप चांगली वर्ष एकत्र घालवायची आहेत. हॅपी बर्थडे सिद्धी बॉय" असं कॅप्शन दिलं आहे. 

पूजाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री सुकन्या मोने यांनी कमेंट करत हॅपी बर्थडे जावई असं म्हटलं आहे. दरम्यान, लग्नानंतर पूजा नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली आहे. तिने कामातून काही वेळ कामातून ब्रेक घेतला आहे. 

टॅग्स :पूजा सावंतसेलिब्रिटीसुकन्या कुलकर्णी