Join us

लगीनघटिका समीप आली! पूजा सावंतच्या हातावर मेहेंदी रंगली; डिझाइनने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 12:15 IST

Pooja Sawant Wedding : 'कलरफुल'च्या हातावर रंगली सिद्धेशच्या नावाची मेहेंदी, पूजा सावंतचे फोटो व्हायरल

प्रथमेश परब, शिवानी सुर्वे यांच्यानंतर आता मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत बोहल्यावर चढण्यासाठी तयार आहे. पूजाची लगीनघाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर तिच्या संगीत सोहळ्यातील व्हिडिओ समोर आले होते. आता नुकताच पूजाचा मेहेंदी कार्यक्रम सोहळा रंगला. 

पूजाच्या घरी तिच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. पूजा सिद्धेश चव्हाणशी लग्न करत संसार थाटणार आहे. तिच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. साखरपुडा आणि संगीत सोहळ्यानंतर आता पूजाच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. महाराष्ट्राची लाडक्या कलरफूलच्या हातावर सिद्धेशच्या नावाची मेहेंदी रंगली आहे. पूजाच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. 

मेहेंदी सोहळ्यासाठी पूजाने खास सप्तरंगी लेहेंगा परिधान केला होता. खड्यांची ज्वेलरी घालून आणि केस मोकळे सोडत पूजाने ग्लॅमरस लूक केला होता. तिच्या मेहेंदी सोहळ्याला मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. पूजा आता लवकरच सिद्धेश चव्हाणबरोबर लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. 

काही महिन्यांपूर्वीच पूजाने सिद्धेशवरील प्रेमाची कबुली दिली होती.  सिद्धेशबरोबरचे फोटो शेअर केल्यानंतर पूजाच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. पूजाचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण हा कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला असतो. लग्नानंतर पूजा काही काळासाठी ऑस्ट्रेलियाला शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा आहेत. 

टॅग्स :पूजा सावंतसेलिब्रेटी वेडिंगसेलिब्रिटी