Join us

हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र अन्...; सत्यनारायण पूजेसाठी नटली नववधू पूजा सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 17:45 IST

Pooja Sawant Wedding : अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. लग्नानंतर आता सत्यनारायण पूजा पार पडली आहे.

महाराष्ट्राची लाडकी कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. सिद्धेश चव्हाणसोबत लग्नबंधनात अडकत पूजाने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत पूजा आणि सिद्धेश सात फेरे घेत लग्नाच्या बेडीत अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता लग्नानंतर त्यांची सत्यनारायण पूजा पार पडली आहे. याचे फोटोही समोर आले आहेत. 

२८ फेब्रुवारीला पूजा आणि सिद्धेशचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. लग्नानंतर नवविवाहित दाम्पत्याच्या घरी सत्यनारायणाची पूजाही पार पडली आहे. सत्यनारायणाच्या पूजेसाठी पूजाने खास निळ्या रंगाची साडी नेसली होती. हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र अशा पारंपरिक लूकमध्ये नववधूचं सौंदर्य खुलून आलेलं दिसलं. पूजाची बहीण रुचिराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन याचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

पूजाने काही महिन्यांपूर्वीच सिद्धेश चव्हाणबरोबरचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर तिने गुपचूप साखरपुडाही केला होता. आता सिद्धेशबरोबर लग्नबंधनात अडकून तिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सिद्धेश हा डिस्नी कंपनीत कामाला आहे. तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला असतो. 

टॅग्स :पूजा सावंतसेलिब्रेटी वेडिंग