Join us  

'आमच्या घरातली गरीबी आणि त्यामुळे...', लक्ष्मीकांत बेर्डे यांची 'ती' जुनी मुलाखत होतेय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 11:59 AM

Laxmikant Berde : लक्ष्मीकांत बेर्डे यांची एक मुलाखत खूप व्हायरल झाली होती. त्यात ते आपल्या आयुष्यातील असाच एक हळवा किस्सा या मुलाखतीत सांगताना दिसत आहेत.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी आपल्या विनोदी आणि अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ते आज आपल्यात नसलेत तरी त्यांच्या चित्रपटांनी रसिकांच्या मनात कायमचं घर केले आहे. त्यांच्यावर प्रेम करणारी अनेक लोक आजही त्यांचे चित्रपट पाहतात. आपल्या आयुष्यात कितीही संकटं आली तरी त्यावर मात करत त्यांनी यशाचे शिखर गाठले. मध्यंतरी त्यांची एक मुलाखत खूप व्हायरल झाली होती. त्यात लक्ष्मीकांत बेर्डे आपल्या आयुष्यातील असाच एक हळवा किस्सा या मुलाखतीत सांगताना दिसत आहेत. 

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या व्हायरल झालेल्या जुन्या व्हिडीओत ते सांगत आहेत की, आमच्या घरातली गरीबी, त्यामुळे असणारे दु:ख हे जिच्या चेहऱ्यावर कधीही पाहिले नाही. सतत हसत राहणारी, दुसऱ्यांना हसवणारी अशी माझी आई, जिच्या पोटी माझा जन्म झाला हे मी माझे भाग्य समजतो. त्यामुळे लहानपणीच ठरवले की मनात जी दु:ख असतील तर ती आपल्यापाशी ठेवायची आणि सतत हसत राहायचं आणि लोकांना हसवायचे.

त्यांनी पुढे सांगितले की, माझी आई अत्यंत आजारी होती. तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पण तेव्हा नेमका संप होता त्यामुळे सगळीकडेच गोंधळ होता. त्यात आम्ही माझ्या आईला स्ट्रेचरवर बसवले. तिला हृदयाचं दुखणं होतं. माझ्या आईचं नावं हे रजनी होतं. तेव्हा तिला ऑपरेशनसाठी आम्ही घेऊन गेलो. तेव्हा माझ्या आईला पाहून डॉक्टर म्हणाले की हे तुम्ही कोणाला आणलंत? तर आम्ही म्हणालो की रजनी बेर्डे. तेव्हा डॉक्टर म्हणाले की नाही, रजनी शहा यांना बोलावले आहे आणि विनोद त्यातला असा की, तिला अबॉर्शेनसाठी आत नेले होते. तेव्हा माझी आई ही हसत होतं आणि ती त्याही अवस्थेत प्रांजळपणे म्हणाली, विनोद काय तुलाच करता येत नाहीत तर सुशिक्षित माणसंही विनोद करू शकतात.

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डे