Join us

"सर्वात स्वच्छ, शिस्तबद्ध मंदिर", श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिरात नतमस्तक झाली प्राजक्ता माळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 15:21 IST

प्राजक्तानं तिच्या देवदर्शनाचे काही खास क्षणही सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

Prajakta Mali Jyotirlinga Yatra  : प्राजक्ता माळी महादेवाची मोठी भक्त आहे हे सर्वांना आता माहिती आहे. २०२३ मध्ये तिने एक संकल्प केला होता की, ती १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा करणार आहे. ही यात्रा एकाच प्रवासात करता येणं तिच्यासाठी शक्य नसल्याने अभिनेत्री टप्प्याटप्प्याने मंदिरांचे दर्शन घेते आहे. प्राजक्ता ज्योतिर्लिंगाची यात्रा करत होती, तेव्हा महाराष्ट्रात भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना प्राजक्ताचं नाव घेतलं  होतं. ज्यामुळे प्राजक्ताला तिची बारा ज्योतिर्लिंगाचा यात्रा सोडून मुंबईत परतावं लागलं होतं.आता धस प्रकरणाचा छडा लावून प्राजक्ताने पुन्हा एकदा आपली यात्रा सुरू केली. नुकतंच प्राजक्ताने आंध्र प्रदेशातील श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे (Mallikarjuna Temple Srisailam) दर्शन घेतले. 

याचे फोटो अभिनेत्रीने ज्योतिर्लिंग यात्रेला पुन्हा सुरुवात केल्याचं म्हटलं आहे. प्राजक्तानं तिच्या देवदर्शनाचे काही खास क्षणही सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्राजक्ता ही  श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिरात नतमस्तक झालेली पाहायला मिळाली. "माझ्या अनुभवातील सर्वात स्वच्छ आणि शिस्तबद्ध मंदिर", असं म्हणत प्राजक्ताने कौतुक केलं. 

प्राजक्तासोबत तिच्या या यात्रेत आईदेखीलसोबत आहे. प्राजक्तानं शेअर केलेल्या या  फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. अनेकांनी या फोटोला लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. १२ ज्योतिर्लिंग यात्रेत आतापर्यंत प्राजक्तानं ९ ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतलं आहे. श्री सोमनाथ, श्री नागनाथ (गुजरात),  श्री त्र्यंबकेश्वर, श्री घृष्णेश्वर, श्री वैजनाथ /वैद्यनाथ (महाराष्ट्र), श्री काशी विश्वनाथ (उत्तर प्रदेश), श्री महाकाल - (उज्जैन- मध्य प्रदेश),  श्री ओंकारेश्वर - (मध्य प्रदेश) आणि आता मल्लिकार्जुन अशी यात्रा तिनं केली आहे.  

टॅग्स :प्राजक्ता माळीसेलिब्रिटीज्योतिर्लिंगआंध्र प्रदेश