प्राजक्ता माळी लवकरच 'चिकी चिकी बुबूम बूम' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रदर्शनाआधीच या सिनेमातील एका गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सिनेमातील 'बूम बूम बूम' हे गाणं अलिकडेच प्रदर्शित झालं आहे. या गाण्यावरील अनेक रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीनेमृण्मयी देशपांडेसह या गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे.
या व्हिडिओत प्राजक्ता आणि मृण्मयी डान्स करताना दिसत आहेत. त्यांनी नऊवारी साडी नेसून 'बूम बूम बूम' गाण्यावर रील बनवला आहे. या व्हिडिओत त्या दोघीही या गाण्याची हुकस्टेप करताना दिसत आहे. प्राजक्ता आणि मृण्मयीचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
'चिकी चिकी बुबूम बूम' या सिनेमात महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमधील कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, प्रसाद खांडेकर, रोहित माने, वनिता खरात, ओंकार राऊत, प्रथमेश शिवलकर, नम्रता संभेराव, अभिजीत चव्हाण, प्रियदर्शिनी इंदलकर, निखिल बने हे कलाकार आहेत. येत्या २८ फेब्रुवारीला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.