Prajakta Mali : आजच्या धावपळीच्या आजच्या आयुष्यात ताणतणाव मोठी समस्या बनली आहे. म्हणूनच धकाधकीत स्वतःचे मानसिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी हास्य महत्त्वपुर्ण आहे. ओठांवर एक तेजस्वी हास्य आपलं सौंदर्य अनेक पटींनी वाढवतं. हसणे हे आरोग्यासाठीही फायदेशीर असून अनेक लाभ मिळतात. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं हसण्याचे महत्त्व अधोरेखित केलं.
प्राजक्ता माळीचा एक व्हिडीओ ilovenagar या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये प्राजक्ताने हसण्याचे महत्त्व सांगितले. ती म्हणाली, "तुम्हाला माहिती असेल नसेल, आपल्या मेंदूमध्ये हसण्याने काही हार्मोन्स जनरेट होतात. जे आपल्या मानसिक आरोग्यासाठी खूप गरजेचे असतात. तर 'हास्यजत्रा' हा तर त्यावरचा रामबाण उपाय आहे. पण, ते तर बघत चलाच. पण, असंही आयुष्यात हसत राहा. कोणीही भेटलं, स्मित हास्य करत चला. त्यांच्यासाठी नाही तर आपल्या स्वत:सासाठी, आपल्या आरोग्यासाठी ते खूप गरजेचं आहे".
प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतंच प्रदर्शित झालेल्या तिच्या 'फुलवंती' हा चित्रपटाने बॉक्स ऑफिस चांगलचं गाजवलं. सध्या प्राजक्ता 'फुलवंती' सिनेमाचं यश एन्जॉय करत आहे. विशेष म्हणजे या सिनेमात ती अभिनेत्री असण्यासोबतच निर्मितीही होती. तसेच नुकतंच तिच्या पहिल्यावहिल्या कवितासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पुरस्कार जाहीर झाला आहे.