Join us

प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'ची कळी खुलेना? ३ दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:55 PM

प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. आता हा सिनेमा येत्या दिवसांत बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, हे पाहावं लागेल. 

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या 'फुलवंती' या सिनेमामुळे चर्चेत आहे. प्राजक्ता मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा ११ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. तर प्रदर्शनाआधीच 'फुलवंती' सिनेमातील गाणीही हिट झाली. प्राजक्ता माळीच्या या सिनेमाची चाहतेही वाट पाहत होते. त्यामुळे या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात मात्र तसं घडताना दिसत नाहीये. 

'फुलवंती' सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील जादू फिकी असल्याचं दिसत आहे. या सिनेमाला प्रेक्षक गर्दी जरी करत असले तरी बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे मात्र फार चांगले नाहीत. 'फुलवंती'चं तीन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार प्राजक्ता माळीच्या सिनेमाला एकाही दिवशी १ कोटींपर्यंतही मजल मारता आलेली नाही. 'फुलवंती'च्या कमाईचे आकडे हे काही लाखांमध्येच आहेत. 

प्रदर्शनाच्या दिवशी 'फुलवंती' सिनेमाने केवळ ८ लाखांची कमाई केली. त्यानंतर मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत दुप्पटीने वाढ झाल्याचं दिसत आहे. शनिवारी प्राजक्ता माळीच्या सिनेमाने ३६ लाख रुपयांचा गल्ला जमवला. तर रविवारी या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर ७५ लाख रुपयांचा बिजनेस करता आला. तीन दिवसांत 'फुलवंती'ने केवळ १.१९ कोटींचा गल्ला जमवला आहे. आता हा सिनेमा येत्या दिवसांत बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो, हे पाहावं लागेल. 

'फुलवंती'मधून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तर या सिनेमाचं दिग्दर्शन स्नेहल तरडेंनी केलं आहे. या सिनेमात प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी, प्रसाद ओक, वैभव मांगले, स्नेहल तरडे, हृषिकेश जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सिनेमातील कलाकारही या सिनेमात झळकले आहेत. 

टॅग्स :प्राजक्ता माळीसिनेमागश्मिर महाजनी