Join us

Video: प्राजक्ता माळीने 'फुलवंती'च्या कलाकारांना दिलं 'पखवाज-घुंगरु' चॅलेंज, बघा कोण जिंकलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 1:25 PM

प्राजक्ता माळीने फुलवंती सिनेमाच्या टीमला दिलं खास चॅलेंंज. यामध्ये कोणी मारली बाजी? बघा व्हिडीओत (phulwanti)

प्राजक्ता माळी सध्या तिच्या आगामी 'फुलवंती' सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. या सिनेमासाठी प्राजक्ताने केलेली मेहनत सर्वांना पाहायला मिळतेय. परिणामी सिनेमाही चांगलाच यशस्वी झाला असून 'फुलवंती'ला मुंबई, पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून चांगलंच प्रेम मिळतंय. 'फुलवंती' सिनेमाची टीम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सहभागी झाली होती. यावेळी प्राजक्ताने 'फुलवंती' सिनेमाची दिग्दर्शिका आणि अभिनेत्री स्नेहल तरडे आणि अभिनेता हृषिकेश जोशींना खास चॅलेंज दिलंय. 

प्राजक्ताने दिलं 'फुलवंती'च्या टीमला खास चॅलेंज

अभिनेत्री प्राजक्ता माळीने 'फुलवंती' च्या टीमला खास चॅलेंज दिलं. 'फुलवंती' सिनेमाच्या दिग्दर्शिका आणि अभिनेत्री स्नेहल तरडे आणि अभिनेते हृषिकेश जोशी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर आले होते. तेव्हा प्राजक्ताने पखवाज आणि घुंगरु हे चॅलेंज त्यांना दिलं. त्यावेळी प्राजक्ता जसं म्हणेल  तसं स्नेहल आणि हृषिकेश यांना एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जायचं असतं. जो यात चुकला तो बाद होणार होता.  प्राजक्ताने यावेळी दोघांपैकी एकाला बाद करण्यासाठी अनेक ट्रिक आजमावल्या. परंतु अंतिमतः प्राजक्ताने हार मानली. कारण स्नेहल-हृषिकेश यांनी अत्यंत हुशारीने अजिबात न हारता या खेळात बाजी मारली. 

'फुलवंती' सिनेमाची खूप चर्चा 

'फुलवंती'मधून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तर या सिनेमाचं दिग्दर्शन स्नेहल तरडेंनी केलं आहे. या सिनेमात प्राजक्ता माळी, गश्मीर महाजनी, प्रसाद ओक, वैभव मांगले, स्नेहल तरडे, हृषिकेश जोशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सिनेमातील कलाकारही या सिनेमात झळकले आहेत. हा सिनेमा सध्या महाराष्ट्रात चांगलाच गाजतोय. प्राजक्ता माळीने साकारलेल्या  प्रमुख भूमिकेचं आणि तिच्या नृत्याचं चांगलंच  कौतुक हौतंय. 

टॅग्स :प्राजक्ता माळीगश्मिर महाजनीमराठीमराठी अभिनेता