Join us

"कदाचित ते होणार नाही; प्राजक्ता माळीला करायचं नाहीये लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 09:13 IST

Prajakta mali: अलिकडेच एका मुलाखतीत प्राजक्ताने लग्न आणि प्रेम याविषयी भाष्य केलं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (prajakta mali). आजवरच्या कारकिर्दीत प्राजक्ताने अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तिची कायम चर्चा रंगत असते.  प्राजक्ता लवकरच एका नव्या कोऱ्या सिनेमासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या सिनेमाच्या निमित्ताने प्राजक्ताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या प्रेमाविषयी भाष्य केलं आहे.

''खऱ्या आयुष्यात प्राजक्ता माळी कधी प्रेमात पडणार आणि लग्नाच्या बेडीत कधी अडकणार?' असा प्रश्न प्राजक्ताला विचारण्यात आला. त्यावर प्राजक्ताने दिलेल्या उत्तरामुळे सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं. "वाट बघा. प्रेमात आहेच मी, स्वत:च्या आयुष्याच्या..मला असं वाटतं की प्रत्येकानेच असलं पाहिजे. कोणाच्या दुसऱ्याच्या प्रेमात का पडायचं? तुम्ही तुमच्या आयुष्याच्या प्रेमातही पडू शकता. जसं की मी, मी पूर्णपणे आहे. मी सतत अशी हसते ते याच प्रेमामुळे शक्य आहे," असं प्राजक्ता म्हणाली.

पुढे ती म्हणते, "बेडीत अडकणं, कुठेतरी बंधनात अडकून राहणे हे माझ्या स्वभावात नाही. हे माझ्या स्वभावाच्या विरोधात आहे. कदाचित ते होणारही नाही. काही सांगता येत नाही." दरम्यान, प्राजक्ता अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम व्यावसायिकादेखील आहे. प्राजक्तराज हा तिचा स्वत:चा सोन्याच्या दागिण्यांचा ब्रँड आहे. 

टॅग्स :प्राजक्ता माळीसेलिब्रिटीसिनेमा