Join us

बोल्ड साडी, छोटा ब्लाऊज, प्राजक्ता माळीने सांगितला किस्सा; झालेली अशी फजिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:25 IST

प्राजक्ताच्या विविध लूक्सची नेहमीच चर्चा असते. सोशल मीडियावरचे तिचे फोटो कायम हटके आणि सुंदर असतात.

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali)  महाराष्ट्रातलं प्रसिद्ध नाव आहे. 'जुळून येती रेशिमगाठी' मध्ये तिने अतिशय गोड अशी मेघनाची भूमिका साकारली. प्राजक्ताला या मालिकेमुळे प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. नंतर ती काही सिनेमांमधून भेटीला आली. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून ती सूत्रसंचालिका म्हणून समोर आली. प्राजक्ताच्या विविध लूक्सची नेहमीच चर्चा असते. सोशल मीडियावरचे तिचे फोटो कायम हटके आणि सुंदर असतात. नुकतंच प्राजक्ताने एका इव्हेंटसाठी तयार होत असताना झालेली फजिती सांगितली.

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली,"एका स्टायलिस्टने मला एक साडी दिली होती. ती खूपच बोल्ड होती. त्याचा ब्लाऊज खूपच छोटा होता. ब्लाऊज मोठा कर असं मी स्टायलिस्टला सांगितलं. तर ती म्हणाली, 'मी कल्पना दिलीच होती की ब्लाऊज छोटा असणार'. पण मला ते घातल्यावर लक्षात आलं की हे मी कॅरी करु शकणार नाही. मग ते उसवून वाढवलं त्यातही चुका झाल्या. मग परत आहे तसं केलं आणि लपवलं. असे बरेच कुटाणे केले. तो लूक माझ्यासाठी खूपच अनकंफर्टेबल होता. तसा बोल्ड होता. तरी मी रेड कार्पेटवर त्या लूकमध्ये गेले. दुसरा काही पर्याय नव्हता. तेव्हा मी बोल्ड दिसली असणार मला माहित आहे. पण मी अजिबातच तसं चेहऱ्यावर दाखवलं नाही."

प्राजक्ताचा 'चिकी चिकी बुबूम बूम' सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्रसाद खांडेकर, वनिता खरात, रोहित माने, नम्रता संभेराव, प्रियदर्शिनी  अशी हास्यजत्रेतली मंडळीही आहेत. सध्या या सिनेमाला थिएटरमध्ये थोडाफार प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसतोय.

टॅग्स :प्राजक्ता माळीमराठी अभिनेताफॅशन