Join us  

Sai Tamhankar : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ती कधीच..., सई ताम्हणकरबद्दल प्राजक्ता माळीचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 3:50 PM

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मधील सई (Sai Tamhankar) तुम्ही अनेकदा बघितली आहे. पण ‘हास्यजत्रा’च्या सेटवर पडद्यामागे ती कशी वावरते, हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असणारचं. तर प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) नेमकं याच प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

मराठी चित्रपटसृष्टीची परम सुंदरी सई ताम्हणकर (Sai Tamhankar) असंख्य कारणांनी सतत चर्चेत असते. अगदी युट्युब पासून हिट चित्रपटांपर्यंत सगळीकडे आपला दबदबा असलेल्या सईचे लाखो चाहते आहेत. सई तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. आपल्या अटींवर जगते. मराठी इंडस्ट्रीचं नव्हे तर बॉलिवूडमध्येही तितक्यात कॉन्फिडन्समध्ये वावरते.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya jatra ) या लोकप्रिय शोमधील तिचा वावरही तितकाच सुखावून जातो. शोमधील प्रत्येक स्किटवरच्या तिच्या कमेंट्स, तिने दिलेली दिलखुलास दाद सगळंच प्रेक्षकांना भावतं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मधील सई तुम्ही अनेकदा बघितली आहे. पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर पडद्यामागे ती कशी वावरते, हे जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या अनेक चाहत्यांना असणारचं. तर प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) नेमकं याच प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर पडद्यामागे सई कशी वागते,याचा खुलासा प्राजक्ताने केला.

  ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्ता सईबद्दल भरभरून बोलली. ती म्हणाली, “ सई एकदम प्रोफेशनल व्यक्ति आहे. प्रोफेशनल आयुष्य कसं असावं? याची प्रेरणा मी तिच्याकडून घेते. मी सेटवर सतत तिचं निरीक्षण करत असते. ना पसारा, ना उगाच्याच गप्पा... ती कोणाशीही गप्पा गोष्टी करत बसत नाही. ती कधीच तिची खुर्ची सोडत नाही. सगळेजण तिच्या खुर्चीजवळ तिच्याशी बोलायला जातात.  एकतर आपल्या व्हॅनिटीमध्ये किंवा व्हॅनिटीमधून थेट आपल्या खुर्चीमध्येच ती तुम्हाला दिसेल. नाहीतर आम्ही? कशी आहेस? वगैरे वगैरे विचारत फिरतो. पण सई याबाबतीत अगदी प्रोफेशनल आहे. हे तिचे गुण घेण्यासारखे आहेत. हे सगळे गुण मी तिच्याकडून शिकते.”  सई ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची जज आहे. तर प्राजक्ता हा शो होस्ट करते. दोघींमध्येही चांगलं बॉन्डिंग आहे.

टॅग्स :सई ताम्हणकरप्राजक्ता माळीमहाराष्ट्राची हास्य जत्रा