कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे.पुन्हा एकदा सगळेच घरात बंदिस्त झाले आहेत. सर्वसामान्यांप्रमाणे सेलिब्रेटींनाही घरात मिळेल ते काम करत वेळ घालवण्याशिवाय पर्याय नाही. सोशल मीडियावर कलाकारांचे लॉकडाऊन रुटीन शेअर करताना दिसतायेत. कोणी वर्कआऊट करतंय तर कोणी पाककलेचा आवड म्हणून वेगवेगळे पदार्थ बनवण्यात मग्न आहे. अशात सोशल मीडियावर प्राजक्ता माळीने देखील तिचा एक खास फोटो चाहत्यांसह शेअर केला आहे.
नुकताच शेअर केलेल्या फोटोला तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. परत भोपळे चौक अवस्था 🤪(घरी बसून भांडी घासायची वेळ आली ) गमतीचा भाग सोडा; परंतू करोनाने इतर अनेक गोष्टींबरोबर पैशांचं नियोजन ही देखील गोष्ट शिकवली. ही शिकवण आयूष्यभर लक्षात ठेवूया. सोशल मीडियावर प्राजक्ता माळीच्या या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटोला दिलेल्या कॅप्शनचे चाहते यावेळी कौतुक करताना दिसत आहेत. नेहमीप्रमाणे तिच्या या फोटोला लाईक्स आणि कमेंट्चा वर्षाव होत आहे.
इतकेच नाहीतर प्राजक्ता माळी हिने इंस्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना कोरोनाच्या संकटामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये घरी राहण्याचे आवाहन केले आहे. सकारात्मक संदेश दिला आहे. साडीमधला एक छानसा फोटो शेअर करत तिने म्हटले आहे की, तुकाराम महाराज सांगतात... ‘आलिया भोगासी- असावे सादर..’ . तेव्हा ही सक्तीची सुट्टी चिंतेत नाही, चिंतनात घालवूया.. थोडक्यात सत्कारणी लावूया...निदान प्रयत्न तरी करूया.
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.
आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. त्यामुळे कोरोना काळातही ती चाहत्यांसह तिचे खास फोटो शेअर करत सकारात्मक संदेश चाहत्यांसह शेअर करताना दिसते.