Join us

Prajaktta Mali : देवा...कसं होणार माझं...? प्राजक्ता माळी असं का म्हणाली; पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 2:29 PM

Prajaktta Mali Post : सध्या प्राजक्ता सोलो ट्रिपवर आहे. यासाठी तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून सुट्टी घेतलीये. पण हे काय? सोलो ट्रिपवर जाऊन 5-6 दिवस होत नाही तोच तिला पळून यावसं वाटतंय...

Prajaktta Mali Post :   प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकतीच तिची ‘रानबाजार’ ही मराठी वेबसीरिज प्रदर्शित झाली. या सीरिजमध्ये प्राजक्ताने दिलेल्या कधी नव्हे इतक्या बोल्ड सीन्सची चांगलीच चर्चा झाली. सध्या काय तर प्राजक्ता सोलो ट्रिपवर आहे. यासाठी तिने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून सुट्टी घेतलीये. पण हे काय? सोलो ट्रिपवर जाऊन 5-6 दिवस होत नाही तोच तिला पळून यावसं वाटतंय.

होय, प्राजक्ताने एक पोस्ट शेअर करत याचा खुलासा केला आहे. प्राजक्ता हिमाचल प्रदेशात एकटी फिरायला गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून या ट्रिपचे अनेक फोटो व व्हिडीओ तिने शेअर केलेत. मात्र आता तिला त्या ठिकाणाहून  पळून यावं असं वाटत आहे. सध्या तिची पोस्ट चर्चेत आहे.

 प्राजक्ताची पोस्ट...ती लिहिते, ‘कुठल्याही सुंदर प्रदेशाचा मी जास्तीक जास्त 5-6दिवस आनंद घेऊ शकते नंतर (काम नसेल तर) मला महाराष्ट्राची कडकडून आठवण यायला लागते...हो आत्ता पळून यावं; इतकी आठवण येतेय...देवा...कसं होणार माझं.. ?’या पोस्टमध्ये तिने महाराष्ट्राचीमुलगी, सह्याद्रीची लेक असा हॅशटॅग दिला आहे.

एकंदर काय तर प्राजक्ताला आता महाराष्ट्राची, घराची व तिच्या कामाची आठवण यायला सुरूवात झाल्याचे या पोस्टवरून दिसत आहे.छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ता माळीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य, दिलकश अदा आणि लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ता अल्पावधीतच रसिकांची आवडती अभिनेत्री बनलीये.

सोशल मीडियावर प्राजक्ता प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ ती सतत शेअर करत असते. ‘रानबाजार’ या वेबसिरीजमधील प्राजक्ताच्या भूमिकेचं समीक्षकांकडून कौतुक झालं. पण नेटकºयांना तिचा बोल्ड अंदाज रूचला नव्हता. यामुळं तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. आता प्राजक्ता माळी पुन्हा एक नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. प्राजक्ता माळी ‘वाय’ सिनेमात एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.  

टॅग्स :प्राजक्ता माळी