प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. अभिनेत्री प्रार्थनाची एक वेगळी स्टाईल आहे. तिच्या इन्स्टावर नजर टाकली तर तुम्हाला कळेल की अमुकएक फॅशन तिने कधीच फॉलो केलेली नाही. प्रार्थना नुकतेच ट्रेडिशनल लूकमधले फोटोशूट शेअर केले आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. प्रार्थनच्या फॅन्सनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे.