कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमीच संवाद साधत असते. तसेच ती सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ देखील शेअर करत असते.
प्रार्थनाचा नुकताच वाढदिवस झाला असून तिने तिचा हा वाढदिवस तिच्या अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने प्रार्थनाने तिच्या लहानपणीचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर पोस्ट केले असून या फोटोंमध्ये प्रार्थना खूपच छान दिसत आहे. तिने यामध्ये तिच्या पहिल्या संक्रातीचा, शाळेतील कार्यक्रमातील असे विविध फोटो शेअर केले आहेत.
प्रार्थना बालपणीदेखील तितकीच सुंदर होती असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. तिच्या या फोटोंना हजारोहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तिच्या या बालपणीच्या फोटोंचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.
प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे. प्रार्थनाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेद्वारे छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. मालिका आणि रुपेरी पडद्यावर तिने आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केली आहे.