Join us  

लग्न सोनालीचं पण चर्चा प्रार्थना बेहेरेची, लंडनमधील तिच्या देसी लूकची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 5:15 PM

Prarthana Behere : नुकताच प्रार्थना बेहरेचा लंडनमधील देसी अंदाजातील व्हिडीओ समोर आला आहे. तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

अभिनेत्री प्रार्थना बेहरे(Prarthana Behere)ने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सध्या ती 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत तिने साकारलेल्या नेहाच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसते. मालिकेत ऑफिसच्या कामासाठी नेहा लंडनला गेल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र नेहा म्हणजेच अभिनेत्री प्रार्थना बेहरे खऱ्या आयुष्यात लंडनमध्ये गेली आहे. पण मालिकेच्या शूटिंगसाठी नाही तर ती तिची सिनेइंडस्ट्रीतील बेस्ट फ्रेंड सोनाली कुलकर्णी(Sonalee Kulkarni)च्या लग्नासाठी गेली आहे. तिच्यासोबत तिचा नवरा अभिषेक जावकरदेखील गेला आहे. नुकताच प्रार्थना बेहरेचा लंडनमधील देसी अंदाजातील व्हिडीओ समोर आला आहे. तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

प्रार्थना बेहरे हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती तिचा नवरा अभिषेक जावकरसोबत दिसते आहे. या व्हिडीओत तिने निळ्या रंगाच्या साडीत दिसते आहे. साडीवर मोठे कानातले आणि लाल टिकली लावलेली दिसते आहे. तसेच आरशात पाहून मेकअप करताना दिसते आहे. तयार झाल्यानंतर नवऱ्यासोबत रोमँटिक अंदाजात पोझ देताना दिसते आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लंडन ठुमकता असे कॅप्शन दिले आहे. प्रार्थना बेहरेच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

प्रार्थना बेहरे लंडनमध्ये सोनाली कुलकर्णीच्या लग्नासाठी गेली आहे. सोनालीने मागील वर्षी ७ मे रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईतील एका मंदिरात लग्न केले होते. यावेळी त्यांच्या घरातल्या सदस्यांनी ऑनलाइन उपस्थिती लावली होती. त्यामुळे सोनालीने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी लंडनमध्ये कुणाल बेनोडेकरसोबत पुन्हा लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाचे फोटो अद्याप समोर आले नाहीत. मात्र तिचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात तिने व्हाइट गाऊन परिधान केलेला पाहायला मिळाला. 
टॅग्स :प्रार्थना बेहरेसोनाली कुलकर्णी