Join us

Prasad oak: जागतिक पुरुष दिनानिमित्त प्रसाद ओकने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले-मंजिरी ताईने....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 4:21 PM

Prasad oak:प्रसाद ओकने जागतिक पुरुष दिनानिमित्त सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. प्रसादच्या या व्हिडीओ बघून नेटकऱ्यांची त्याची पत्नी मंजिरीची आठवण झाली आहे

प्रसाद ओक (Prasad oak) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. दर्जेदार अभिनयामुळे ओळखला जाणार प्रसाद सध्या त्याच्या उत्तम दिग्दर्शकीय कौशल्यामुळे चर्चेत येत आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारा प्रसाद आणि त्याची पत्नी मंजिरी ओक (manjiri oak) दोघंही सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे अनेकदा दोघांचे रिल्सही सोशल मीडियावर चर्चेत येत असतात.

प्रसाद ओकने जागतिक पुरुष दिनानिमित्त सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. समस्त पुरुष वर्गाला शुभेच्छा देण्यासाठी शेअर केलेला प्रसादनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  या व्हिडीओमध्ये प्रसाद आयपॅडवर काहीतरी बघताना दिसत आहे. तेवढ्यात मागून कुणीतरी मुलीच्या आवाजात “बेबी मेकअपला हिंदीमध्ये काय म्हणतात?” असं विचारतंय यावर प्रसाद म्हणतो “धोका” असं म्हणतोय. या व्हिडीओला प्रसादने “ज्यांनी ज्यांनी हा ‘धोका’ खाल्ला आहे त्या समस्त पुरुष वर्गाला ‘जागतिक पुरुष दिना’च्या शुभेच्छा”, असं कॅप्शन दिलं आहे.

प्रसादच्या या व्हिडीओ बघून नेटकऱ्यांची त्याची पत्नी मंजिरीची आठवण झाली आहे. मंजिरी ताईने अजून वाचला नाही वाटत, मंजिरी ताई कुठे आहात तुम्ही. “मंजिरी खूप सुंदर आहे. तिला मेकअपची गरज नाही”, अशी मजेदार कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. 

टॅग्स :प्रसाद ओक सेलिब्रिटी