Join us  

Prasad Oak :'थोडं उशिरा लक्षात आलं, पण.." प्रसाद ओकचा 'तो' व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 4:52 PM

दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारा प्रसाद सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे.

प्रसाद ओक (Prasad oak) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. दर्जेदार अभिनयामुळे ओळखला जाणार प्रसाद सध्या त्याच्या उत्तम दिग्दर्शकीय कौशल्यामुळे चर्चेत येत आहे. दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारा प्रसाद सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. अनेकदा त्याचे कॉमेडी रिल्सही सोशल मीडियावर चर्चेत येत असतात.

प्रसाद ओकने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत प्रसाद मनाचं सौंदर्य हेच खरं सौंदर्य असं म्हणताना दिसतोय. व्हिडीओच्या सुरुवातील प्रसाद म्हणतोय, आज जवळपास 396 सेल्फि काढल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, मनाचं सौंदर्य हेच खरं सौंदर्य. या व्हिडीओतील प्रसादच्या चेहऱ्यावरील हवभाव कमालीचे आहेत. 'थोडं उशिरा लक्षात आलं, पण आलं ते महत्वाचं' असे कॅप्शनसोबत सोबत हसणाऱ्या इमोजी त्याने पोस्ट केल्या आहेत. प्रसादचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं आहे. 

मोबाईल ची मेमरी फुल झाल्याने दृष्टांत झाला... तथास्तु, मग मनाचा सेल्फी काढाना, गं बाई!  केवढा तो निरागसपणा, जाऊद्या सर एवढं मनावर घेऊ नका, 396 मधुन जे फोटो आधी डिलिट केले होते तेच ओरिजल होते, बाकी सब मोहमाया. प्रसादच्या या व्हिडीओवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर प्रसादचा ‘धर्मवीर 2’ सिनेमाची ही अधिकृत घोषणा झाली आहे. त्यामुळे २०२३मध्ये प्रसाद ओकच्या अभिनय कौशल्याची जादू प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद तसेच दिग्दर्शन प्रवीण तरडे यांचे आहे.

टॅग्स :प्रसाद ओक