Join us

प्रशांत दामले सांगतात, रंगभूमीशी जुळलेले बंध आयुष्यभर कायम राहतील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2017 3:47 PM

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अभिनेता प्रशांत दामले याने राज्य केले आहे. त्यांचा अभिनयाने प्रेक्षक ही त्यांच्या अभिनयाच्या प्रेमात पडलेले ...

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अभिनेता प्रशांत दामले याने राज्य केले आहे. त्यांचा अभिनयाने प्रेक्षक ही त्यांच्या अभिनयाच्या प्रेमात पडलेले पाहायला मिळत आहे. असा हा प्रेक्षकांचा लाडका कलाकार आपल्या यशस्वी प्रवासाविषयी सांगतो, गेली ३५ वर्षापासून रंगभूमीवर माझा हा प्रवास सुरू आहे.  या प्रवासात रंगकर्मी, दिग्दर्शक आणि रसिकांची मोलाची साथ मिळाली, मी त्यांचा आभारी आहे. तसेच रंगभूमीने प्रेम आणि आनंद दिला. याच आशीवार्दाने काम करण्याचा हुरूप अदयाप ही जिवंत आहे. रंगभूमीशी जुळलेले बंध आयुष्यभर कायम राहतील अशी भावना त्यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली. तसेच रंगभूमीवर काम केल्याने मानसिक आनंद मिळतो. त्यामुळे मी अजूनही रंगभूमीवर टिकून आहे. रसिकांच्या प्रतिसादामुळेच माज्या नाटकांचे प्रयोग अदयापही  सुरू आहेत. अभिनय हे आपल्या कलेने समृद्ध करायचे असते. अभिनयासाठी भाषेची समृद्धी आणि स्वच्छ आवाज लागतो. हेच गुण मी नवोदित कलाकारांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमावेळी साखर खाल्लेला माणूस' या नाटकाचा प्रयोग करण्यात आला. सध्या प्रशांत दामले यांच्या या नाटकाची चर्चा खूपच गाजत असल्याची पाहायला मिळत आहे. या नाटकाच्या माध्यमातून शुभांगी गोखले यादेखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. त्या नाटकाच्या माध्यमातून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि अभिनेते प्रशांत दामले ही जोडी पहिल्यांदाच या नाटकात एकत्र आली आहे. त्याचप्रमाणे किशोर इंगळे यांनी छायाप्रकाशाच्या खेळातून नाटकाची पिंडप्रकृती सांभाळली आहे. अशोक पत्कींचं संगीतदेखील उत्तम आहे. गुरू ठाकूर यांचं गाणं देखील नाटकाला चार चाँद लावतात.  तर ऋचा आपटे आणि  संकर्षण कºहाडे या दोन कलाकारांनीदेखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकत आहे.