Join us

प्रथमेश परबने घेतली सनी देओलची भेट; काय आहे 'या' भेटीमागचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 13:50 IST

Prathamesh parab: सध्या सोशल मीडियावर प्रथमेश आणि सनीचा फोटो व्हायरल होत आहे.

मराठी कलाविश्व आणि बॉलिवूड यांच्यातील दरी गेल्या काळात बऱ्यापैकी कमी झाली आहे. अनेक मराठी कलाकार बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकत आहेत. तर, काही बॉलिवूड स्टार्स सुद्धा मराठी इंडस्ट्रीची वाट धरत आहेत. यामध्येच सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता सनी देओल (sunny deol ) आणि 'टाइमपास'फेम प्रथमेश परब (Prathamesh parab) यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  त्यामुळे प्रथमेशने सनी देओलची भेट का घेतली हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 

प्रथमेश सध्या अनेक कारणांसाठी चर्चेत येत आहे. एकीकडे त्याचं लग्न ठरलं आहे. दुसरीकडे त्याचा डिलिव्हरी बॉय हा सिनेमा रिलीज होतोय. आणि, त्यामध्येच त्याने सनी देओलची भेट घेतलीये. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये दगडू म्हणजेच प्रथमेश सातत्याने चर्चेत येत आहे. 

अलिकडेच प्रथमेशच्या डिलिव्हरी बॉय या सिनेमाचं भन्नाट पोस्टर रिलीज झालं. यानंतर प्रथमेश आणि त्याच्या सिनेमाच्या टीमने सनी देओलची भेट घेतली. या भेटीमध्ये सनीने प्रथमेशला त्याच्या आगामी सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी प्रथमेश आणि सनी यांनी एकत्र फोटो काढला.

दरम्यान, मोहसीन खान दिग्दर्शित डिलिव्हरी बॉय हा सिनेमा येत्या ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रथमेशसोबत पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडे-पाटील हे कलाकार झळकले आहेत. या सिनेमाची निर्मिती डेव्हिड नादर यांनी केली आहे. 

टॅग्स :प्रथमेश परबसनी देओलसिनेमामराठी अभिनेता