Join us  

'टाईमपास' फेम प्रथमेश परबच्या घराबाहेरची पाटी पाहिलीत का? 'अशी ही बनवाबनवी' शी आहे कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 12:27 PM

प्रथमेश परबने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.

'टाईमपास' मधला दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) काही महिन्यांपूर्वीच लग्नबंधनात अडकला. गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत (Kshitija Ghosalkar) त्याने थाटात लग्न केले. दोघंही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात आणि चाहत्यांसोबत बऱ्याच गोष्टी शेअर करत असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या घराबाहेर लावलेल्या हटके पाटीचा व्हिडिओ शेअर केला. या पाटीचा संबंध थेट 'अशी ही बनवाबनवी' सिनेमाशी आहे.

प्रथमेश परबने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांच्या घराबाहेर हटके पाटी लावली आहे. त्यावर लिहिले, 'हो, क्षितिजा आणि प्रथमेश परब इथेच राहतात. त्यांच्या या पाटीमुळे 'अशी ही बनवाबनवी' मधल्या 'धनंजय माने इथेच राहतात का?' या डायलॉगची आठवण येते. सोबतचे त्यांनी घरातील फ्रीजवर अष्टविनायक गणपतीचे स्टीकर लावले आहे. यासोबत प्रथमेशने ज्यांनी ही पाटी बनवून दिली त्यांचे आभार मानले आहेत. तो लिहितो, "अशी ही बनवाबनवी या चित्रपटावर, त्यातील प्रत्येक पात्रावर आणि प्रत्येक dialogue वर भरभरून प्रेम करणाऱ्या अनेकांपैकी आम्हीही एक!"

प्रथमेशच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत कौतुक केलं आहे. 'सुंदर जोडी' म्हणत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रथमेश आणि क्षितीजा यांनी लग्न केलं. दोघंही काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.  प्रथमेश नुकताच 'ताजा खबर सीझन 2' सीरिजमध्ये दिसला.

टॅग्स :प्रथमेश परबमराठी अभिनेतासुंदर गृहनियोजनसोशल मीडिया