Join us  

Prathmesh Parab : गेली अनेक वर्षं मी...!  प्रथमेश परबसाठी रिअल लाईफ ‘प्राजू’ची खास पोस्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 3:17 PM

Prathmesh Parab : आज प्रथमेशचा ( Prathmesh Parab)वाढदिवस. वाढदिवसानिमित्त प्रथमेशवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत. यातली एक पोस्ट एकदम खास आहे...

अरे हम गरीब हूए तो क्या हुआ, दिल से अमीर है... अमीर... हा डायलॉग आठवताच आठवतो तो ‘टाईमपास’मधला दगडू. हाच दगडू आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचा लाडका अभिनेता झाला आहे. आम्ही बोलतोय तो दगडूची भूमिका साकारणाऱ्या प्रथमेश परबबद्दल. आज प्रथमेशचा ( Prathmesh Parab)वाढदिवस. वाढदिवसानिमित्त प्रथमेशवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अनेकांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत. यातली एक पोस्ट एकदम खास आहे. कारण ती लिहिलीये ती प्रथमेशच्या रिअल लाईफ ‘प्राजू’ने.

होय, दगडूला खऱ्या आयुष्यातील ‘प्राजू’मिळाल्याचं मानलं जातंय. प्रथमेशने अभिनेत्री क्षितिजा घोसाळकरसोबत दिवाळी साजरी करतानाचे काही फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून क्षितिजा व प्रथमेशबद्दल वेगळीच चर्चा सुरू झाली होती. दादूस आमची वहिनी काय? असा प्रश्न अनेकांनी प्रथमेशला विचारला होता. याच क्षितिजाने प्रथमेशच्या वाढदिवसासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

वाचा, क्षितिजाची पोस्टकाय लिहु अरे तुझ्याबद्दल!म्हणजे फक्त Happy Birthday to you लिहून सुद्धा wish करता आलं असतं मला, पण तुझं कौतुक करायला मला नेहमीच आवडतं आणि त्यातुन आज निमित्त वाढदिवसाचं! मग ही संधी मी कशी बरं सोडेन? गेली अनेक वर्षं मी तुझा अभिनय , Dance बघतेय, ज्यात तू नेहमीच Best असतोस. पण अलीकडील काही वर्षे तुझ्यातील अभिनेत्या बरोबरच तुझ्यातील माणूसपण अनुभवतेय! फिल्म लहान असो किंवा मोठी,त्यात तुझे सीन्स कमी असोत किंवा जास्त, ते तू मनापासूनच करतोस. प्रचंड बरं नसतानाही शुटींग, promotion, Dance Rehearsal, हे सगळं तू तितक्याच dedication ने करतोस.  बरं हे सगळं करत असताना कित्येकदा होणारं Trolling, अजिबात मनावर न घेता किंवा स्वतःची मानसिक स्थिती बिघडवू न देता, ती गोष्ट हसण्यावारी घेऊन तुझ्या कामातून, तुझ्या performance मधून एकदम #चोख उत्तर देतोस. आणि इतकं सगळं करून सुद्धा कोणत्याही गोष्टीचा तसूभरही गर्व न करता, सतत काहीतरी नवीन शिकण्याचा ( मग ते शून्यापासून का असेना) तुझा अट्टाहास वाखाणण्याजोगा असतो. #नेहमीच! सतत हसणं आणि इतरांना हसवण,समजून घेणं, समजून सांगणं,कधीतरी अगदीच लहान तर कधीकधी खूप Mature,समोरच्यातील एखादी लहानशी गोष्टही appreciate करून त्याला motivate करणं.....!सगळं किती easily करतोस रे तू! बऱ्याचदा Actor म्हटलं की त्याच्या on screen roles मुळे ,तो रिअल लाईफमध्येही तसाच असावा असं पटकन judge केलं जातं.पण 70MM च्या पडद्यापलिकडील प्रथमेश हा खूप जास्त pure आहे, Honest आहे आणि कायम असाच रहा!

प्रथमेशने आतापर्यंत अनेक हीट चित्रपटांमध्ये काम केले आहे. प्रथमेशने बालक-पालक, टाईमपास, टाईमपास 2, लालबागची राणी, उर्फी अशा अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये काम केलं. या सिनेमांमुळे तो आता स्टार झाला आहे. ‘बालक-पालक’ या सिनेमातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. कुटुंबात अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना प्रथमेशनं आज उत्तम अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. मराठीसोबतच दृश्यम, खजूर पे अटके आणि अन्य या हिंदी चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे.

टॅग्स :प्रथमेश परबमराठी अभिनेता