Join us

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, पण मराठी सिनेमा दाखवायला थिएटर्स नाहीत; अभिनेता प्रथमेश परबची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 12:11 IST

"अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या मराठी सिनेमाला महाराष्ट्रातच...", थिएटर मिळत नसल्याने प्रथमेश परब नाराज

मराठी सिनेमांना महाराष्ट्रात थिएटर्स मिळत नाही, याबाबत अनेकदा कलाकारांकडून खंत व्यक्त केली जाते. अलिकडेच तेजश्री प्रधान हिने हॅशटॅग तदेव लग्नम या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. आता महाराष्ट्रात मराठी सिनेमाला थिएटर नसल्याने अभिनेता प्रथमेश परबही चिडला आहे. प्रथमेशने याबाबत त्याच्या सोशल मीडियावरुन सविस्तर पोस्ट लिहिली आहे. 

प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असलेला सिनेमा नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. पण, प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असूनही सिनेमाला थिएटर नाहीत, त्यामुळे प्रथमेशने पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. 

काय म्हणाला प्रथमेश परब? 

एखाद्या सिनेमासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेते. त्याच्या स्क्रिप्टवर, व्यक्तिरेखेवर, नकळत प्रेम जडू लागतं. अगदी जीव ओतून सिनेमा बनवला जातो. आपली व्यक्तिरेखा, त्यातलं वेगळेपण मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचून त्यांचं मनोरंजन करता यावं असं प्रत्येक कलाकाराला वाटतं. 

 

चित्रपट प्रदर्शित होतो. प्रेक्षकांना तो फार आवडतो. थिएटर visit केल्यानंतर त्याच्या live reactions, त्यांच्या डोळ्यांतील अश्रू, आशीर्वाद, आमच्याशी भरभरुन साधलेला संवाद हे सगळं अनुभवायला मिळतं. आज प्रेक्षकांना सिनेमा बघायचाय...पण, तो दाखवायला आमच्याकडे थिएटर्सच नाहीत. 

अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषिक सिनेमाला महाराष्ट्रात स्क्रीन मिळत नाही, यापेक्षा दुर्देवी काय असू शकतं...

प्रथमेशच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. त्याबरोबरच अभिनेत्याला पाठिंबाही दिला आहे. प्रथमेश बरोबर श्री गणेशा सिनेमात संजय नार्वेकर, मेघा शिंदे, शशांक शेंडे यांच्या मुख्य भूमिका आहेत.  

टॅग्स :प्रथमेश परबमराठी अभिनेतासिनेमा