Join us

"स्वामी कोण हे मला माहितीच नव्हतं, मी देवाला मानत नव्हतो..", प्रवीण तरडेंनी सांगितली 'देऊळ बंद'मागची रंजक गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:51 PM

देऊळ बंद सिनेमा बनवण्यापूर्वी प्रवीण तरडे स्वतः देवाला एवढे मानत नव्हते. स्वामी समर्थ कोण हे त्यांना अजिबातच माहीत नव्हते.

काही वर्षांपूर्वी आलेला 'देऊळ बंद' हा चित्रपट आठवतोय? अभिनेता-दिग्दर्शक प्रवीण तरडेचा हा चित्रपट अक्कलकोटचे 'श्री स्वामी समर्थ' महाराज यांच्या भक्तीवर आधारित होता. या चित्रपटाला चांगलं यश मिळालं होतं. २०१५ साली आलेल्या 'देऊळ बंद' या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. या चित्रपटात गश्मीर महाजनी आणि मोहन जोशी मुख्य भूमिकेत झळकले होते. आता या सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी एक इंटरेस्टिंग किस्सा सांगितला आहे. 

 प्रवीण तरडे स्वतः देवाला एवढे मानत नव्हते. स्ट्रगल काळात त्यांना स्वामींवर एक डॉक्युमेंटरी बनवण्याची संधी मिळाली. त्याआधी स्वामी कोण हे प्रवीण तरडे यांना अजिबातच माहीत नव्हते. कैलास वाणी प्रवीण तरडेना म्हणाले की मला समर्थांवर एक डॉक्युमेंटरी बनवायची. 

प्रवीण तरडे यांना वाटलं ते समर्थ म्हणजे समर्थ रामदास असं कोणीतरी असेल. पण हा फोटो दुसऱ्याच कोणाचा तरी आहे हा रामदास स्वामींचा नाही दिसत. ते मला म्हणाले तुम्ही ओळखतच असाल स्वामींना?. त्यावर प्रवीण तरडे फोटो दाखवून हात जोडत म्हणाले ‘हे काय’. त्यांनी मला ५ लाखांचं बजेट असल्याचं सांगितलं. खरतंर एवढ्याशा बजेटमध्ये काहीच होणार नाही असा  मनात विचार सुरु असताना देखील प्रवीण तरडे यांनी होकार दिला. ते म्हणाले उद्या आपल्याला नाशिकला जायचंय, कथा तयार करुन ठेवा. 

एका माउलींनी प्रवीण तरडे यांना प्रश्न केला की, ‘तुम्ही खरंच देव मानता?’ त्यावर ते म्हणाले, मी मानतो असं नाही पण माझे आईवडील वारकरी आहेत. वारीला जातात, घरात सकाळ संध्याकाळ पूजा असते.त्यावर ते पुन्हा म्हणाले ‘तुम्ही मानता?’. प्रवीण तरडे यांनी कबुली दिली की, ‘नाही मी नाही मानत एवढं देवाला’. तेव्हा त्यांनी प्रश्न केला की, ‘खरं सांगा ही गोष्ट आता सुचली का आधी?’  इथे आल्यावर ही कथा सुचल्याचं सांगितलं. माऊली हसले आणि उठून म्हणाले की, ‘वाटेल ते बजेट द्या , डॉक्युमेंटरी नाही मला ह्याच्यावर सिनेमा करायचाय’. आणि मग स्टोरी बनत गेली तसा तो सिनेमा बनत गेला. आणि हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला.”  ‘देऊळ बंद’ या चित्रपटामध्ये मोहन जोशी यांनी स्वामी समर्थांची प्रमुख भूमिका साकारली होती. स्वामी समर्थांच्या गेटअप मधील त्यांचा लूक प्रदर्शित केल्यानंतर जोशींना पाहून पहिल्यांदा सगळेच अवाक् झाले होते. 

टॅग्स :प्रवीण तरडे