Join us

"हिंदू ही संस्कृती आणि 'सनातन' हा धर्म", प्रवीण तरडे यांच्या पत्नी स्नेहल तरडे नेमकं काय म्हणाल्या ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 2:10 PM

स्नेहल तरडे यांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये हिंदू आणि सनातन यावर भाष्य केलं

मराठी कलाविश्वातील परफेक्ट जोडी म्हणून प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे या जोडीकडे कायम पाहिलं जातं. प्रवीण तरडे (pravin tarde) एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक आहेत. तर, स्नेहल (snehal tarde) सुद्धा उत्तम अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे  स्नेहल यांनी 'वेदांचा अभ्यास' पुर्ण केलेला आहे. आता त्यांनी पतीच्या पावलावर पाऊल ठेवत  'फुलवंती' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे.  या चित्रपटात त्यांनी अभिनयदेखील केला आहे. मात्र, सध्या त्या एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. 

स्नेहल तरडे यांनी नुकतंच आरपार या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हिंदू आणि सनातन यावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, "आजच्या जगण्याला अध्यात्म,वेद हे कसं संबंधित कसं असेल याचा अभ्यास पालकांचा नाहीये, हा दोष पालकांचाही नाहीये. या पद्धतीच इंग्रजांनी अशा उखडवून ठेवल्या आहेत. धर्म संपवायचा, भारतीय संस्कृतींसोबत अनेक संस्कृती होत्या, त्या हळूहळू लयाला गेल्या. पण भारतीय संस्कृती अजूनही जिवंत आहे, कारण ती श्रेष्ठ आहे. कालानुरुप तिने स्वत:ला सिद्ध केलंय. ती सनातनी आहे, ती आधीपासून होती. अजून राहणार. जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत ती असणार आहे. इतकं श्रेष्ठत्व तिच्यामध्ये आहे. पण असं श्रेष्ठत्व मूळापासून उखडून टाका. या विचाराने त्या संस्कृतीपासून अनेक पिढ्या तोडल्या गेल्या".

पुढे त्यांनी म्हटलं, "हिंदू धर्माचे अनेक तुकडे झाले. मी इथे हिंदू धर्म म्हणतेय, पण खर तर आपल्या धर्माचं नाव सनातन आहे, हे लक्षात घ्यायला हवं. सनातन हा शब्दही आपसकूपणे निघून गेलाय. आपण जर एखाद्या कॉलममध्ये धर्म लिहिताना हिंदू असं लिहितो, हिंदू ही संस्कृती आहे. आपल्या धर्माचं नाव सनातन आहे. पण सनातन असं आपण लिहित नाही. तो सनातन आहे. ना आदी आहे ना अंत आहे. तो सनातन पुर्वीपासून आहे".

स्नेहल म्हणाल्या, "आपल्याला पद्धतशीरपणे हिंदू मराठा, हिंदू ब्राह्मण या वेगवेगळ्या जातींमध्ये तोडलं गेलंय. त्याच्यामध्ये आता द्वेष निर्माण झालाय. माझी मनापासून इच्छा आहे, की प्रत्येक जातीने एक व्हायला हवं. आपल्यात वेगळेपण आहे पण ते वेगळेपण आपण सेलिब्रेट करायला हवं. तर तो हिंदू धर्म टिकून राहिल आणि तो एकसंध राहिल. राजकीय भांडवलासाठी हे सगळं केलं जातंय.सत्तेसाठी राजकारण केलं जातंय आणि एकमेकांपासून माणसं तोडली जातायत".

टॅग्स :प्रवीण तरडेहिंदू