परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढ्याच तिखट...'सरसेनापती हंबीरराव'चा अंगावर शहारे आणणार ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 12:59 PM2022-05-14T12:59:34+5:302022-05-14T13:23:25+5:30
सह्याद्राचा कडा श्वास रोखून लढा अशा प्रवीण तरेडेंच्या दमदार डायलॉगने ट्रेलरची सुरुवात होते.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्य गाथा अख्खा महाराष्ट्र जाणून आहे. हंबीररावांनी महाराजांसमवेत अनेक मोहिमा फत्ते करून मराठा साम्राज्याची पाळमूळ घट्ट करण्यात मोलाचं योगदान दिलं होतं. प्रवीण तरेडे(Pravin tard) यांच्या सरसेनापती हंबीरराव( Sarsenapati hambirrao) सिनेमाच्या ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सह्याद्राचा कडा श्वास रोखून खडा अशा प्रवीण तरेडेंच्या दमदार डायलॉगने ट्रेलरची सुरुवात होते. ट्रेलरमध्ये सरसेनापती हंबीरराव म्हणून प्रवीण तरेडेंची दमदार अंदाजात एंट्री झाली आहे. परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढ्याच तिखट अशा अनेक जबरदस्त डायलॉगने सरसेनापतीचा ट्रेलर भरलेला आहे. 'संभाजीना समजून घेण्या करिता तुम्हाला तुमचं काळीज शिवाजी महाराजांचं करावं लागलं, कारण संभाजी एकदाच माफ करतो पुन्हा गुन्हागार साफ करतो' असं म्हणत गश्मीर महाजनीची ट्रेलरमध्ये धडकेबाज एंट्री होते.ट्रेलरमध्ये व्हिज्युअल आणि ग्राफिक्सचा इफेक्ट्सची झलक दिसतेय. ट्रेलर बघून सिनेमाबाबत रसिकांची उत्सुकता वाढली आहे.
हा भव्य, ऐतिहासिक मराठी चित्रपट येत्या 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रविण तरडे साकारत आहे.