कलाकार सोशल नेटवर्किंग साईट्सवर सतत वेगवेगळ््या अपडेट्स देऊन त्यांच्या खासगी आयुष्यात काय चाललेय या गोष्टींचा उलगडा करीत असतात. चाहत्यांना देखील आपल्या आवडत्या कलाकारांच्या सर्वच गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते. आता हेच पाहा ना, अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने नूकतेच एक टविट केले आहे. यामध्ये प्रार्थना स्वत:ला व्यक्त करताना सांगतेय की, मी बदललेली नाहीये तर स्वत:ला नव्याने शोधलय. आता प्रार्थना असे का बोलतेय हे तरी काही समजलेले नाही. परंतू सध्या तिच्या करिअरचा चढता आलेख पाहता, बॉलिवूडमध्ये एंट्री केल्याने तर प्रार्थनाने स्वत:च्या अभिनय गुणांना नव्याने शोधले नाही ना असा प्रश्न देखील पडतो.
प्रार्थना म्हणतेय, मी स्वत:ला शोधले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2016 10:57 AM