कोकणाच्या पार्श्वभूमीवर खुलणार ‘प्रीतम’ ची प्रेमकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 06:30 AM2019-03-27T06:30:00+5:302019-03-27T06:30:01+5:30

प्रीतम’ या मराठी चित्रपटाची कथा कोकणच्या भूमीत घडणारी आहे आणि त्या जोडीला एक हळवी प्रेमकथा या निसर्गरम्य सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर खुलणार आहे.

Pritam movie love story based in konkan culture | कोकणाच्या पार्श्वभूमीवर खुलणार ‘प्रीतम’ ची प्रेमकथा

कोकणाच्या पार्श्वभूमीवर खुलणार ‘प्रीतम’ ची प्रेमकथा

googlenewsNext
ठळक मुद्देमल्याळम दिग्दर्शक सिजो रॉकी या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत. 

निसर्गाने सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केलेला प्रदेश म्हणजे कोकण. गेल्या काही वर्षात मराठी चित्रपटांमधून कोकणाची निसर्गरम्य भूमी रुपेरी पडद्यावर दिसली. आगामी ‘प्रीतम’ या मराठी चित्रपटाची कथा कोकणच्या भूमीत घडणारी आहे आणि त्या जोडीला एक हळवी प्रेमकथा या निसर्गरम्य सौंदर्याच्या पार्श्वभूमीवर खुलणार आहे. कोकणसारखाच निसर्गाचा वरदहस्त केरळला सुद्धा लाभला आहे. कोकण आणि केरळचा एक अनोखा संगम या चित्रपटाच्या निमित्ताने जुळून आला आहे.  केरळ मधील प्रसिद्ध "विझार्ड प्रोडक्शन" या चित्रसंस्थेच्या माध्यमातून ‘प्रीतम’ या मराठी चित्रपटाची निर्मिती होत असून मल्याळम दिग्दर्शक सिजो रॉकी या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत. 

चिपळूण, कणकवली, कुडाळ या नयनरम्य परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून प्रणव रावराणे आणि नक्षत्र मेढेकर ही फ्रेश जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्यासोबत उपेंद्र लिमये, शिवराज वाळवेकर, आनंदा कारेकर, अस्मिता खटखटे, आबा वेलणकर, समीर खांडेकर, नयन जाधव,  विश्वजित  पालव, अजित देवळे, कृतिका या कलाकारांच्या भूमिका आहेत. 

 ‘प्रीतम’ चित्रपटाच्या माध्यमातून कोकणचे सौंदर्य प्रेक्षकांना अनुभवता येणार असून या लोकेशन व प्रेमकथेविषयी बोलताना दिग्दर्शक सिजो रॉकी सांगतात कि, ‘सगळ्यांना प्रेमात पाडणाऱ्या लोकेशनची आवश्यकता होती आणि त्यासाठी आम्हांला कोकणाशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. एक नितांतसुदर आणि मनाला मस्त फील देणारा अनुभव ‘प्रीतम’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मिळेल’,असा विश्वास ते व्यक्त करतात.

चित्रपटाची निर्मिती फैझल निथीन, सिजो करीत आहेत. चित्रपटाची  संहिता  सुजित कुरूप, पटकथा-संवाद गणेश पंडित यांचे असून चित्रपटाची गीते गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. कला दिग्दर्शन संदीप रावडे करीत असून कास्टिंग डायरेक्टर आणि वेशभूषा चैत्राली डोंगरे करीत आहेत तर संकलन जयंत जठार करणार आहेत. छायांकन ओम प्रकाश, संगीत विश्वजिथ यांचे तर  नृत्य दिग्दर्शन सुजित कुमार यांचे आहे. जय कुमार नायर, रफिक टी. एम आणि चैत्राली डोंगरे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

Web Title: Pritam movie love story based in konkan culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.