मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे एक क्युट कपल म्हणून ओळखले जातात. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते लग्नबेडीत अडकले होते. त्यांच्या लग्नाला 8 वर्षे झाले असतानाही आजही त्यांच्यातील केमिस्ट्री खूप भारी वाटते.प्रिया बापट आणि उमेश कामत हे एकाच इंडस्ट्रीत असल्याने एकमेकांना खूप अगोदरपासून चांगले मित्र होते. कालांतराने दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले पण एकमेकांसाठी असलेले प्रेम व्यक्त कोण करणार अशी अडचण होती. अखेर प्रियाने पुढाकार घेत प्रेम व्यक्त केले आणि उमेशने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या प्रेमाला होकार दिला.
याची आठवण करत प्रियाने एका मुलाखतीत सांगितले होते की, उमेशने लग्नासाठी फार वेळ घेतला. आमच्या रिलेशनशीपमध्ये मी पुढाकार घेतला होता आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी मी इतकी आतूर झाले होते की मी स्वतःला लंपट समजायला लागले होते.
अखेर उमेशने लग्नाचा निर्णय घेत ऑक्टोबर 2011 साली लग्न केले. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात.