Join us

कॅमेरासमोर प्रिया बापट झाली बोल्ड; सोशल मीडियावर होतीये तिची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 18:30 IST

Priya Bapat: प्रियाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे.

आपल्या दमदार अभिनयशैलीमुळे कलाविश्वासह प्रेक्षकांना आपलंसं करणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (priya bapat). नाटक, मालिका, सिनेमा आणि आता तर वेबसीरिज अशा सगळ्यात क्षेत्रात प्रियाचा मुक्तपणे वावर आहे. त्यामुळे दिवसेंदिवस प्रियाचा चाहतावर्ग वाढत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे प्रियादेखील या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा शक्य होईल तितका प्रयत्न करते. यामध्ये अलिकडेच तिने एक बोल्ड फोटोशूट केलं आहे.

गेल्या काही काळापासून प्रियाचा सोशल मीडियावरचा वावर वाढला आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन पोस्ट चाहत्यांसाठी करत असते. यात सध्या तिच्या एका बोल्ड फोटोची चर्चा रंगली आहे. प्रियाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. यात तिने डोळ्यांचा बोल्ड मेकअप केला असून त्याला साजेसा वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे. त्यामुळे तिचा हा लूक चांगलाच लोकप्रिय ठरत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून प्रिया सातत्याने चर्चेत येत आहे.  नुकताच तिच्या 'सिटी ऑफ ड्रीम्स' या वेबसिरीजचा तिसरा सिझन आला आहे. राजकारणावर आधारित या वेबसिरीजमध्ये प्रिया बापट सोबतच अतुल कुलकर्णी, सचिन पिळगांवकर, एजाज खान यांच्याही मुख्य भूमिका आहेत.  

टॅग्स :प्रिया बापटसेलिब्रिटीसिनेमासचिन पिळगांवकरअतुल कुलकर्णी