Join us

केळीच्या पानात जेवतानाचा फोटो शेअर करुन ट्रोल झाली प्रिया बापट, नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 16:31 IST

बऱ्याचदा प्रिया बापट सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती चर्चेत येत असते. आता तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे, ज्यामुळे तिला ट्रोल केलं जातंय.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील गुणी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (priya bapat). मालिका, चित्रपट, वेब सीरिज या माध्यमांमधून प्रिया प्रेक्षकांच्या भेटीला आली. त्यामुळे सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहतावर्ग असल्याचे पाहायला मिळते. सध्या प्रिया तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. तरीदेखील ती सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधत असते. बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे ती चर्चेत येत असते. आता तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे, ज्यामुळे तिला ट्रोल केलं जातंय. 

प्रिया बापटने ओनमच्या शुभेच्छा देत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे त्यासोबत तिने केळीच्या पानात जेवतानाचे फोटो शेअर केला. यावरून प्रियाला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका यूजरने लिहिले, केळीच्या पानातल अस पान ठेऊन जेवतात ? प्रथम पाहतो. नेहमी पान आडव नाहो तर सरळ ठेवतात. तर दुसऱ्याने लिहिले, मॅडम टाएट विसरु नका. तिसऱ्याने लिहिले, स्वयंपाक कोणी केला. अशा कमेंट्स तिच्या या फोटोवर केल्या आहेत. 

दरम्यान प्रिया शेवटची २०१८ साली आम्ही दोघी चित्रपटात झळकली होती. त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात पाहायला मिळाली नाही. लवकरच ती ‘विस्फोट’ या हिंदी सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियासोबत फरदीन खान आणि रितेश देशमुख दिसणार आहेत. 

टॅग्स :प्रिया बापटसेलिब्रिटी