Join us

सुखी संसाराची 13 वर्ष, प्रिया बापटने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त लिहिली नवऱ्यासाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 13:08 IST

लग्न वाढदिवसानिमित्ताने प्रियाने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर या जोडीने मराठी इंडस्ट्रीत त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच पडद्यावर त्यांच्या केमिस्ट्रीला जितकी नेटकऱ्यांची पसंती मिळते. तितकीच ऑफस्क्रीनदेखील ही जोडी लोकप्रिय आहे. या दोघांच्या लग्नाचा आज १३वा वाढदिवस आहे. 

लग्न वाढदिवसानिमित्ताने प्रियाने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.   प्रियाने उमेशसोबतचे रोमॅण्टिक फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये तिने लिहलं,  "लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज लग्नाला १३ वर्षे झाली आणि आपल्या एक असण्याला २० वर्षे…खूप सार प्रेम, हसणं आणि  रात्रीच्या जेवणासाठी काय हवं आहे हे विचारणं?". 

प्रियाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवर मराठी कलाकारही व्यक्त होताना दिसत आहेत. अभिनेत्री श्रेया बुगडे, पल्लवी पाटील, सोनाली खरे या  कलाकार मंडळींसह चाहत्यांनी कमेंट करत दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळतंय. उमेश आणि प्रिया दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दोघांचे एकत्र फोटो पाहण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामतलग्न